0
अधिकारी म्हणतात : इमारत मजबूत, कोणताही धोका नाही

औरंगाबाद- छावणीतील निझाम बंगल्याच्या परिसरातील इमारतीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. मात्र, छतावर वडाचे झाड उगवले असून कापले तरी मुळ्या खोल गेल्याने इमारतीला धोका असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र इमारत मजबूत असल्याचे सांगत धोका नाही, असा दावाही करत आहेत. छावणीतील निझाम बंगला परिसरातील सरकारी निवासस्थानांत मराठा विद्यार्थी वसतिगृह सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. लवकरच याचे उद्घा टनही करण्यात येणार आहे. मात्र इमारतीच्या छतावरील वडाच्या भल्या मोठ्या झाडाच्या फांद्या तोडल्या असल्या तरी त्याची मुळे थेट छतालाच पोखरत असल्याचे समोर आले आहे.

राज्यातील दुसरे मराठा विद्यार्थी वसतिगृह :

राज्यातील दुसरे मराठा वसतिगृह औरंगाबादेत सुरू होणार आहे. छावणीतील निझाम बंगला परिसरातील ४० वर्षे जुन्या चार इमारतीत गंगा, यमुना या नावाने वसतिगृह तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी ६० मुले व ३० मुलींच्या निवास,भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. निवड समितीचे सचिव या नात्याने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची निवडही केली आहे.


४० वर्षे जुन्या इमारतींमध्ये सुरू होतेय वसतिगृह; ६० मुले व ३० मुलींच्या निवासाची व्यवस्था
२५ तुकडे करत विनानिविदा दिले कंत्राटदाराला ८० लाखांचे काम , रंगरंगोटी, डागडुजी करून निझाम बंगल्याची इमारत वसतिगृहासाठी सज्ज केली आहे. जागतिक बँक प्रकल्प विभागाने एका कंत्राटदारास कामाचे २५ तुकडे करत विनानिविदा ८० लाख रुपयांचे काम दिले. या कामाची जबाबदारी असणाऱ्या उपविभाग क्र. चारचे औरंगाबाद (पश्चिम) विभागाकडे सोपवण्यात आली. तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांकडून हा विभाग तडकाफडकी काढून घेण्यात आला होता.


युद्धपातळीवर डागडुजी

निझाम बंगल्यातील चार इमारतींची युद्धपातळीवर डागडुजी, रंगरंगोटी करण्यात आली असली, तरी या इमारतीच्या छतावर दोन फूट व्यासाचे तीन वर्षे वयाचे वडाचे झाड आहे. कंत्राटदाराने या झाडाच्या फांद्या तोडल्या असल्या तरी मुळे खोल रुतल्याने छताला तडे गेले आहेत.


रिकामटेकडी मंडळी करताहेत दिशाभूल
हे झाड नष्ट करण्याच्या सूचना कंत्राटदारास दिल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानानुसार ठराविक रसायन बुंध्यात टाकल्यास झाड जळून जाते. त्यामुळे इमारतीला धोका होणार नाही. काही रिकामटेकडी मंडळी इमारतीबाबत तक्रारी करून दिशाभूल करत आहेत.The Hostel officer says: The building is strong, there is no danger

Post a comment

 
Top