0
महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू असताना पडली वादाची ठिणगी; चाकूने करण्यात आला हल्ला

  • धुळे : महापालिका निवडणुकीच्या वादातून काल शुक्रवारी (दि.२१) रात्री मिल परिसरातील नारायण मास्तर चाळीत दाेन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दाेन्ही गटांनी एकमेकांवर गावठी कट्ट्यातून गाेळीबार केला. त्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव जखमी झाले. दुसऱ्या गटातील दीपक पुकळेही जखमी झाले. दाेन्ही गटांनी हाणामारीसाठी हाॅकी स्टिक, लाेखंडी राॅडसह इतर हत्याराचा सर्रास वापर केला. या वेळी परिसरातील चार ते पाच दुचाकींची तोडफोड करण्यात आली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहे. याप्रकरणी परस्पर विराेधी तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून पाेलिसांनी तीन जणांना अटक केली. त्यांना साेमवारपर्यंत पाेलिस काेठडी देण्यात अाली अाहे.


    शहरातील मिल परिसरातील जाधव परिवार व पुकळे परिवारात वाद अाहे. निवडणुकीपूर्वी दाेन्ही गटांनी एकत्र निवडणूक लढवावी, यादृष्टीने प्रयत्न झालेे. त्यानंतर काल शुक्रवारी सायंकाळी लेनिन चाैक ते क्रांतिचाैकदरम्यान काही तरुण निवडणुकीबाबत चर्चा करत होते. त्या वेळी पुकळे परिवाराच्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित झाला. त्यातून वादाची ठिणगी पडली. गणेश निकम अाणि दीपक पुकळे यांंच्यात शाब्दिक वाद झाला. या वादातून पुकळे परिवाराने निकम यांना व त्यांच्या परिवाराला मारहाण केली. रात्रीची वेळ असल्याने अनेक जण झाेपी गेले हाेते. मात्र, अारडाअाेरड एेकून अनेक जण बाहेर अाले. ताेपर्यंत दाेन्ही गटांकडील सदस्य समोरासमोर अाले हाेते. त्यांनी हातातील लाठ्याकाठ्या, हाॅकी स्टीक व लाेखंडी राॅडने एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जाधव परिवारातील काही जण तेथे पाेहाेचले. त्यांनाही शिवीगाळ व मारहाण करण्यात अाली. या वेळी दाेन्ही गटाकडून एकमेकांवर गावठी कट्यातून गाेळीबार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव यांच्या पाठीवर गाेळी लागल्याने ते जखमी झाले. त्याचबरोबर चाकू हल्ल्यात दीपक पुकळेही जखमी झाला. या वेळी जाधव व निकम यांच्या घराच्या परिसरात असलेल्या दुचाकींची ताेडफाेड करण्यात अाली. घटनेत चार वाहनांचे नुकसान झाले.

    घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पाेलिस अधीक्षक सचिन हिरे, शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक गणेश चाैधरी फाैजफाट्यासह घटनास्थळी आले. त्यांनी गर्दीला पांगविले. घटनेमुळे रात्री परिसरात तणाव निर्माण झाला हाेता. रात्री याठिकाणी माेठ्या प्रमाणावर पाेलिस बंदाेबस्त ठेवण्यात अाला हाेता. दाेन्ही गटातील जखमींना जिल्हा रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
    पोलिस बंदोबस्त वाढवला; तणाव पूर्ण शांतता, काहींची पोलिसांनी केली चौकशी, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार
    शहरातील नारायण मास्तर चाळ परिसरात झालेल्या वादानंतर दुचाकींची करण्यात आलेली तोडफोड. जमावाने चार ते पाच दुचाकींचे नुकसान झाले.


    पिस्तूल, काडतुस पाेलिसांनी घेतले ताब्यात
    याप्रकरणी पोलिसांनी गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुस ताब्यात घेतले अाहे. गावठी पिस्ताेल नेमके काेणाचे अाणि ते कुठून अाणले गेले याची चौकशी सुरू आहे. इतरही अाराेपींचा शाेध घेतला जात आहे. काही जणांची शनिवारी चाैकशीही करण्यात अाली. दरम्यान, दीपक पुकळे यांना दुपारी नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

    जिल्हा रुग्णालयातून अहवाल 
    जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव यांना झालेली दुखापत गोळीबारामुळे झाली का अन्य हत्यारामुळे झालाचा अहवाल िजल्हा रूग्णालयाकडून अहवाल मागविला जाणार अाहे. त्यानंतर स्थिती स्पष्ट होईल. -व्ही.एन.ठाकरे, तपास अधिकारी

    पऱस्परविराेधी गुन्हा दाखल 
    याप्रकरणी दाेन्ही गटांनी परस्परविराेधी तक्रार दिली आहे. त्यावरून दाेन्ही गटातील सदस्यांविरुद्ध शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. दूधविक्रेता गणेश जगनाथ निकम (वय ४६) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले अाहे की, अमाेल माणिक पुकळे, संदीप माणिक पुकळे, दीपक माणिक पुकळे, तुषार पुकळे, हर्षल पुकळे, विक्की पुपळे, मनाेज पुकळे, नयन गणेश गुल्हाणे, दिनेश पुकळे, अविनाश रमेश पुकळे, माेतीराम पुकळे, सागर सपकाळ, प्रवीण सपकाळ, शुभम सपकाळ, वृषभ सपकाळ सर्व रा.नारायण मास्तर चाळ यांनी घरावर हल्ला केला. तसेच अापल्यासह नातेवाईक, शेजाऱ्यांना मारहाण केली. अमाेल पुकळे याने गावठी कट्ट्यातून केलेल्या गाेळीबारामुळे सुधीर जाधव जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी शैलाबाई माणिक पुकळे (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले अाहे की, सचिन निकम, संजय सुधाकर जाधव, बंटी सुधाकर जाधव, पंकज सुधीर जाधव, सुनील पाटील, अरूण निकम, दिनेश कापुरे, गणेश निकम, सुधीर जाधव हे शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता एकत्र आले. त्यांनी चाकूने अापल्यावर व नातेवाइकांवर हल्ला केला. तसेच गणेश निकम याने गावठी कट्ट्यातून गाेळी झाडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत दीपक पुकळे याला सुधीर जाधव यांनी चाकू मारल्याने मारल्याचे म्हटले अाहे. दाेन्ही तक्रारीवरून शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक एम.डी.खडसे, सहायक उपनिरीक्षक व्ही.एन. ठाकरे तपास करत आहेत.The debate sparked the debate over the election of municipal elections

Post a Comment

 
Top