0
या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचे अहमदनगर येथे आपातकालीन लॅन्डिंग करावे लागले. उड्डान भरत असताना हेलिकॉप्टरचे एक सीट बेल्ट बाहेरच राहिल्याने गोंधळ उडाला आणि एमरजेंसी लॅन्डिंग करावे लागले. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. हेलिकॉप्टरची चूक दुरुस्त केल्यानंतर पवार आणि त्यांचे सहकारी पुन्हा आपल्या दिशेने रवाना झाले.
नगरमध्ये भाजपाला पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई
अहमदनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना पवारांनी पक्षाचे आदेश धुडकावून लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल असे सांगितले. भाजपाला कोणत्याही परिस्थिती पाठिंबा द्यायचा नाही, असे आपण स्पष्टपणे सांगितले होते. तरीही आदेश धुडकावून भाजपला पाठिंबा देण्यात आला. प्रदेशाध्यक्षांचे आदेश धुडकावणाऱ्यांवर 5 दिवसांच्या आत त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.NCP Leader Sharad pawar helicopter emergency landing at ahmednagar

Post a Comment

 
Top