0
एंटरटेन्मेंट डेस्कः बिझनेसमन मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचे 12 डिसेंबर रोजी लग्न झाले. मुकेश अंबानींच्या अँटीलिया या निवासस्थानी हा लग्नसोहळा संपन्न झाला. या लग्नाचे काही व्हिडिओज समोर आले आहेत. त्यापैकी एका व्हिडिओत अमिताभ बच्चनपासून ते आमिर खान, ऐश्वर्या राय बच्चन पाहुण्यांना जेवण वाढताना दिसत आहेत. सेलेब्सचे हे व्हिडिओ बघून सोशल मीडिया यूजर्नी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. अखेर सेलिब्रिटी अंबानींच्या लग्नात वाढपी का झाले? हा प्रश्न यूजर्सनी उपस्थित केला आहे. सेलेब्स ट्रोल झाल्यानंतर अभिषेक बच्चनने यामागच्या कारणाचा उलगडा केला आहे.


- अभिषेक बच्चनने उत्तर देताना म्हटले, 'गुजराती लग्नांमधील ही एक पद्धत असून त्याला सज्जन घोट म्हटले जाते. या पद्धतीनुसार, मुलीकडची मंडळी मुलाकडच्या मंडळींना स्वतः जेवण वाढत असतात.'


- आमिर, अभिषेकसह अनेक सेलिब्रिटी लग्नात मुलीच्या बाजुने सहभागी झाले होते. ईशाच्या लग्नात आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासह ऐश्वर्या राय बच्चन आणि शाहरुख खान यांनीही स्वतः पाहुण्यांना जेवण वाढले. मुलीच्या लग्नात मुकेश अंबानी यांनी पाहुण्यांना चांदीच्या ताटात जेवण जेऊ घातले होते.

Post a Comment

 
Top