0
  • woman murder in bhuj-dadar-expressमुंबई- भूज-दादर एक्स्प्रेसच्या लेडीज कोचमध्ये अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दादर स्टेशनवर एक्स्प्रेस आल्यानंतर आरपीएफ जवानाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. दाडियादेवी शंकर चौधरी (वय-40,रा.सुरत) अशी महिलेची ओळख पटली आहे.
    पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दाडियादेवी शंकर चौधरी या सुरत येथून एक्स्प्रेसमध्ये बसल्या होत्या. त्या वडाळ्यात राहणार्‍या आपल्या बहिणीकडे जात होत्या. दादर स्टेशनवर एक्स्प्रेस आल्यानंतर लेडीज कोचमध्ये दाडिया यांचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. शुक्रवारी सकाळी या महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
    या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. वसई, बोरीवली आणि दादर रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरु आहे.

Post a comment

 
Top