0
सरकारी नोकरीसाठी फिटनेस हवा म्हणून राहुल आणि अमर मॉर्निंग वॉकसाठी बुलढाणा महामार्गावर रस्त्यावर आले होते.

बुलडाणा- महामार्गावर मॉर्निंग वॉकला जाणे दोन तरुणांच्या जिवावर बेतल्याची घटना मलकापुरात सोमवारी सकाळी घडली. अज्ञात वाहनाने तरुणांना चिरडले. त्यात एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा तरूण गंभीर जखमी झाला. मृत तरुणाच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. मलकापूर तालुक्यातील मौजे निंबारी फाट्यानजीक सकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

राहुल समाधान नेमाडे (वय-20) असे मृत तरुणाचे नाव असून अमर निना शेळके (वय-20) हा गंभीर जखमी आहे. सरकारी नोकरीसाठी फिटनेस हवा म्हणून राहुल आणि अमर मॉर्निंग वॉकसाठी बुलढाणा महामार्गावर रस्त्यावर आले होते. निंबारी फाट्यानजीक अद्यात वाहनाने राहुलला चिरडले. या अपघातात त्याच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अमर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या कमरेवर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच दोघांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. अमरला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

दरम्यान राहुलच्या अपघाती मृत्युमुळे निंबारीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Youth Death in Accident during Morning Walking in Malakapur

Post a comment

 
Top