८५ किलोमीटर अंतराचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रयोग
औरंगाबाद- देशात प्रथमच स्कायबसने प्रवास शक्य होणार आहे. ही स्काय बस प्रायोगिक तत्त्वावर सर्वप्रथमच औरंगाबादमधून धावेल. केंद्रीय भूपृष्ठ व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथे आढावा बैठकीत ही घोषणा केली. वाळूज ते जालना अशा ८५ किमी मार्गासाठी गडकरी यांनी ही स्कायबस सुचवली. मेट्रोच्या तुलनेत हा खर्च कमी असल्याचे ते म्हणाले.
गडकरी रविवारी एका लग्नसमारंभासाठी औरंगाबादेत होते. तत्पूर्वी त्यांनी सायंकाळी विभागीय आयुक्तालयात मराठवाड्यातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांचा आढावा घेतला. या वेळी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
स्कायबस मेट्रोपेक्षा स्वस्त..
वाळूज-जालना जोडण्यासाठी मेट्रो द्यावी अशी मागणी आ. अतुल सावे यांनी केली होती. याचा उल्लेख करत गडकरी म्हणाले, मेट्रोचा खर्च २५० कोटींवर आहे. मी ऑस्ट्रेलियात जी स्कायबस पाहिली ती अवघ्या ५० कोटींत होईल. डॉफेल मेअर या ऑस्ट्रेलियन व रॉबॅकस या भारतीय कंपनीचे अधिकारी औरंगाबादला १६ जानेवारीला सादरीकरण करतील.

अटलजींच्या काळातही काेकणात प्रकल्प उभारण्याची झाली हाेती तयारी, मात्र १० वर्षांत गुंडाळण्याची नामुष्की
तत्कालीन पंतप्रधान अटलजींच्या कार्यकाळात २००३ मध्ये सर्वप्रथम काेकणात स्कायबस प्रकल्प मंजूर झाला हाेता. मात्र पात्र कंपनी पुढे न आल्याने व वाढीव खर्च न झेपल्याने सुरू हाेण्यापूर्वीच २०१३ मध्ये हा प्रकल्प गुंडाळण्याची नामुष्की ओढवली. प्राथमिक चाचण्यांनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला हाेता. तरीही गाेव्याच्या मडगावमध्ये १० मीटर उंचीवर १.६ मीटरचा ट्रॅक व दाेन एसी काेच तयार केले हाेते. मात्र ५० काेटी खर्च व्यर्थ गेला. या प्रकल्पातील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी आणखी १०० कोटी खर्च लागेल. ताे झेपत नसल्याचे कोकण रेल्वेचे तत्कालीन एमडी भानुप्रकाश तायल म्हणाले हाेेते.

Post a Comment