0
७१ वर्षांचे जीन-जॅक्स सविन ४५ हजार किलोमीटर अंतर जाणार

पॅरिस- जीन-जॅक्स सविन (७१)यांनी प्लायवूडपासून तयार केलेल्या पिपातून अटलांटिक महासागरात प्रवास सुरू केला आहे. कॅप्सूलवजा या पिपात कोणतेही इंजिन नाही. यामुळे सविन या पिपातून वारे आणि समुद्राच्या लाटावर ४५ हजार किमीचा प्रवास करणार आहेत. या पिपात झोपण्यासाठी अंथरुण आहे. त्यात ते स्वत:ला बांधून झोपू शकतात. याशिवाय स्वयंपाक घर आणि स्टोअरेजची सोय आहे. या पिपात त्यांनी एक महिन्याचे खाण्याचे सामान व फळे ठेवली आहेत. प्रवासात मनोरंजनासाठी पिपाच्या चहुबाजूने काचेच्या छोट्या खिडक्या आहेत. या समुद्र प्रवासात लाइव्ह टीव्हीप्रमाणे कार्य करतील. त्यांना एल हियरोपासून (कॅनरी बेट)निघाल्यानंतर तीन महिन्यात कॅरेबियन येथे पोहाेचणे अपेक्षित आहे.

सविनला जीपीएस यंत्रणा ट्रॅक करेल
प्लायवूडचा दहा फूट लांब व ६.८ फूट रुंदीचा हा पिंप आहे. याला सरळ ठेवण्यासाठी काँक्रीटचा पाया करण्यात आला आहे. प्रवासात सविन यांचा माग काढण्यासाठी पिंपात जीपीएस यंत्रणा आहे. कॅप्सूलमध्ये त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपग्रहाचे तंत्रज्ञान आहे.

अटलांटिकचा चार वेळा प्रवास केला
लष्करी सेवेत असलेले सविन हे साहसी पर्यटक आहेत. त्यांनी यापूर्वी चार वेळा जहाजातून अटलांटिक महासागरातून प्रवास केला आहे. सविन यांना या प्रवासासाठी ५५ हजार युरोचा (सुमारे ४३.३९ लाख) प्राथमिक निधी मिळाला होता.
71-year-old man will travel 45,000 kilometers in sea

Post a Comment

 
Top