0
भाजपने देशभर अशा स्वरुपाच्या 70 पत्रकार परिषदा आयोजित केल्या आहेत.

मुंबई - संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत घेऊन काँग्रेसवर हल्लाबोल केला. रफाल प्रकरणी भाजपवर खोटे आरोप लावणाऱ्या काँग्रेसच्या काळातच संरक्षण करारांमध्ये भ्रष्टाचार झाला असे आरोप त्यांनी लावले. एवढेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सर्वच संरक्षण करार आणि व्यवहार कायद्यांच्या आधीन राहूनच केले. अशी स्पष्टोक्ती संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे. काँग्रेसने भाजपवर लावलेले भ्रष्टाचाराचे आरोप सुप्रीम कोर्टाने खोटे ठरवले. तसेच भाजप सरकारला राफेल प्रकरणी क्लीनचिट दिली. त्यानंतर काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न करताना भाजप आणि केंद्रातील मंत्र्यांनी देशभर 70 ठिकाणी पत्रकार परिषदा आयोजित केल्या. संरक्षण मंत्र्यांची मुंबईतील पत्रकार परिषद त्याचाच एक भाग होती.

Post a Comment

 
Top