- मुंबई. दिर्घकाळापासून न्यूयॉर्कमध्ये कँसरवर उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्र पुन्हा भारतात परतली आहे. सोनालीने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना ही आनंद वार्ता दिली. यासोबतच तिने एक इमोशनल मॅसेजही पोस्ट केला आहे. सोनालीने लिहिले की, "दूरावा नेहमीच आपल्या मनातील प्रेम वाढवत असतो आणि दूरावा आपल्याला काय शिकवतो याकडे कधीच दुर्लक्ष करु नये. घरापासून दूर न्यूयॉर्कच्या प्रवासात मला अनेक गोष्टींची जाणिव झाली. प्रत्येक व्यक्ती आपली कहानी आपल्या पध्दतीने लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. आता जेथे माझे हृदय आहे तिथे मी परत येत आहे." 4 जुलै 2018 रोजी सोनालीने तिला कँसर असल्याचा खुलासा केला होता.सोनालीने लिहिले की,
"सध्या ज्या फिलिंग्स आहेत, त्या मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. लवकरच मी कुटूंबाला भेटण्याचा आनंद घेऊ शकणार आहे."
- "मला जे करायचे होते ते मी आता करु शकणार आहे यामुळे मी एक्सायटेड आहे. विशेष म्हणजे तो प्रवास, जो मी आतापर्यंत केला. पण लढा अजून संपलेला नाही. पण मी आनंदी आहे आणि या हॅप्पी इंटरव्हलची प्रतिक्षा करतेय. हा क्षण सामान्य नाही आता मी त्याला मिठी मारण्यासाठी प्रतिक्षा करु शकत नाही."- सोनालीने पोस्टच्या शेवटी क्रिस मार्टिनचे एक कोटेशन लिहिले आहे. - "तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्यापेक्षा एका स्वप्नाप्रमाणे दूर आहे. आम्ही असे हिरा आहोत जे वजन आणि दबावामुळेच आकार घेत आहोत."फ्रेंड सोनालीला म्हणाली वॉरियर प्रिंसेस
- सोनाली भारतात आल्याच्या वृत्तानंतर तिचे फ्रेंड्स आणि कलीग खुप आनंदी झाले आहेत. फराह खानने सोनालीच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, "लवकर घरी ये, मी तुझ्यासाठी मासे आणण्यासाठी जात आहे."
- सोनालीची बेस्ट फ्रेंड सुजैन खानने लिहिले की, "माझी वॉरियर प्रिन्सेस मी तुला पाहण्यासाठी प्रतिक्षा करु शकत नाही. लव्ह यू टू मच" तर अभिषेक बच्चन आणि ट्विंकल खन्नानेही आपला आनंद व्यक्त केला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment