0
दुष्काळाची पहाणी करण्यासाठी राज्याच्या दौऱयावर असलेल्या केंद्रीय पथकाने आज जिह्यातील करमाळा तालुक्यातील जातेगाव, कामोणे, बिटरगाव, रोशेवाडी गावातील पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पथकातील एफसीआयचे उपसंचालक एम.जी.टेंभुर्णे, सुभाषचंद्र मिना आणि चारा विशेषतज्ञ विजय ठाकरे यांनी ग्रामस्थाशी संवाद साधला. शेतकरी व शेत पिकाचा आढावा घेतला.
यावेळी आयुक्त म्हैसकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले, डॉ.राजेद्र भारूड, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, जिल्हा कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, प्रांताधिकारी मारूती बोरकर, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकासाधिकारी श्रीकांत खरात, उपविभागीय कृषी अधिकारी तळेकर, तालुका कृषी अधिकारी संजयकुमार  गायकवाड, पोलिस निरिक्षक श्रीकांत पाडुळे, कृषी पर्यवेक्षक सुहास पोळके, राजकुमार शिंदे, नलवडे, मंडळ अधिकारी सादिक काझी, संतोष गोसावी आदि उपस्थित होते.
यावेळी जातेगाव येथील शेतकरी किसनराव वारे यांच्या कापूस व दिलीप जाधव यांच्या तूर पिकांची पाहणी या केंद्रीय पथकाने केली. कामोणे येथे भरगावात शेतकऱयाबरोबर या पथकाने चर्चा केली. तर बिटरगावात पिकांची पाहणी केली. या दौऱयावेळी शेतकऱयांना विविध प्रश्न या पथकातील अधिकाऱयानी विचारले. यावेळी शेतकऱयांनी पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला असल्याचे सांगितले. दुष्काळामुळे पाणी, चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे असेही शेतकऱयांनी सांगितले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष वारे, जिल्हा परिषदेच्या सदस्या राणी वारे उपस्थित होते.
यावेळी सचिन वारे, दिलीप जाधव, बलभीम काकडे या शेतकऱयाच्या शेतातील पिकाची दुरवस्था पथकाने पाहिली. याप्रसंगी जातेगावचे सरपंच गोविंद वारे, खडकीचे सरपंच बळीराम शिंदे, सुरेश ससाणे, सुरेश पाटील, रविंद्र शिंदे, गोरख धुमाळ, विलास शिंदे, भाऊसाहेब धुमाळ, अमोल घुमरे, दीपक शिंदे, रमेश पाटील, शांतीलाल माने, महावीर नरसाळे, संदिप वारे, तलाठी बिजले, दत्तात्रय निकम यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
पथक आज सांगोल्यात
केंद्र सरकारचे दुष्काळ पाहणी पथक क्रमांक 2 सांगोला तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आज सकाळी 9 वाजता दाखल होणार असल्याची माहिती तहसीलदार संजय पाटील यांनी दिली. सांगोला परंपरागत दुष्काळी तालुका असला तरी यंदा पाऊस न पडल्याने नागरिकांवर टंचाईची परिस्थिती ओढवली आहे.  दुष्काळी तालुक्यांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक क्रमांक 2 सकाळी 9 वाजता राजापूर येथे दाखल होणार आहे. राजापूर येथील दुष्काळी पाहणी करून 9.25 वाजता जुनोनी गावातील शेती, पिके व सर्वांगीण परिस्थिती याची पाहणी करून पथक सांगली जिह्याकडे रवाना होणार आहे

Post a Comment

 
Top