0
आग लागताच अनेकांनी जीव मुठीत घेऊन बाहेर पडले, परंतु वृद्धांना बाहेर पडणे अशक्य झाले.

  • मुंबई- मुंबईत कापडाच्या गोदामात आग लागून ३ व कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास चेंबूरमध्ये इमारतीत लागलेल्या आगीत ५ जणांचे प्राण गेले.
    ही घटना चेंबूरमधील टिळकनगर परिसरातील सरगम सोसायटीच्या ३५ व्या क्रमांकाच्या इमारतीच्या अकराव्या मजल्यावर घडली. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुनीता जोशी (७२), भालचंद्र जोशी (७२), सुमन जोशी (८३), श्रीनिवास जोशी (८३) आणि सरला गंगर अशी मृतांची नावे आहेत. ही १५ मजल्यांची इमारत असून रात्रीची वेळ असल्याने बहुतांश रहिवासी घरातच होते. दरम्यान, आग लागताच अनेकांनी जीव मुठीत घेऊन बाहेर पडले, परंतु वृद्ध तसेच महिलांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे ते आगीत अडकले. यातच आधी सुनीता आणि भालचंद्र जोशी यांचा होरपळून मृत्यू झाला, तर श्रीनिवास जोशी हे धुरामुळे अत्यवस्थ झाले होते. त्यांची रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. प्रत्यक्षदर्शीच्या मते, घटनेवेळी घरात दोन स्फोट झाले. शिवाय, अनेक घरांत ही आग पसरली. अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ बचावकार्य सुरू करत इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढले. रात्रीची वेळ असल्याने वाऱ्यामुळे ही आग आणखीनच भडकत होती. त्यामुळे बचावकार्यात खूप अडचणी येत होत्या.Five elderly people were death in a fire in Mumbai building

Post a comment

 
Top