0
थंडी वाढल्यावर सतत सर्दी होत असते. ही सर्दी सायनसचे इंफेक्शनही असू शकते. यापासून आराम मिळण्यासाठी रोज हे तीन योग केल्यास

थंडी वाढल्यावर सतत सर्दी होत असते. ही सर्दी सायनसचे इंफेक्शनही असू शकते. यापासून आराम मिळण्यासाठी रोज हे तीन योग केल्यास फायदा होतो.


जलनेति : सगळ्यात आधी तुम्ही असा लोटा घ्या तो सहज तुमच्या नाकातील छिद्रात जाईल. लोट्यात अर्धा लिटर कोमट पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ टाका. त्यानंतर तुम्ही कागासनात दोन्ही पायांमध्ये दीड फूट अंतर ठेवून बसा. त्यानंतर कमरेतून पुढे वाका. नाकाचे जे छिद्र त्या वेळी सर्वाधिक सक्रिय आहे त्याच्या विरुद्ध डोके वाकवा. आता लोट्याच्या तोटीतून ते पाणी नाकाच्या सक्रिय छिद्रात टाका. या वेळी तोंड उघडे ठेवा, जेणेकरून तुम्हाला श्वास घेणे सोपे होईल. पाण्याला नाकाच्या एका छिद्रातून आत जाऊ द्या, ते पाणी दुसऱ्या छिद्रातून आपोआप बाहेर येण्यास सुरुवात होईल. अर्धे पाणी संपल्यावर लोट्याला बाजूला ठेवून नाक साफ करा. दुसऱ्या छिद्रातदेखील हीच प्रक्रिया करा.

ही खबरदारी घ्या 
- एक्स्पर्टच्या उपस्थितीत करणे योग्य. 
- यात पाणी आणि मिठाचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे, कारण मीठ जास्त असल्यास नाकात जळजळ होऊ शकते. 
- जलनेतिनंतर नाक कोरडे करण्यासाठी भस्रिका प्राणायाम करणे फायदेशीर ठरते.
yoga tips for Sinus in marathi

Post a Comment

 
Top