0

आपलाच 'तसला' व्हिडीओ पाहून विवाहितेच्या पायाखालची जमीन सरकते.

  • नागपूर- फेसबुकवर विवाहितेचा अश्लील व्हिडीओ शेअर होतो. क्षणात तो व्हायरलही होतो. 5000 हून जास्त लोक व्हिडीओ पाहातात, शेअर करतात. अखेर तो व्हिडीओ संबंधित विवाहितेच्या स्मार्टफोनवर जातो. आपलाच 'तसला' व्हिडीओ पाहून विवाहितेच्या पायाखालची जमीन सरकते. ती थेट पोलिस स्टेशन गाठते. तक्रार नोंदविते. पोलिस तपास करतात. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करणार्‍याला अटक करतात. आरोपी दुसरा, तिसरा कुणी नाही तर पीडित महिलेचा पतीच निघतो. अशीच घटना कळमेश्वर तालुक्यात घडली आहे. विशेष म्हणजे महिलेचे लव्ह मॅरेज झाले आहे.

    पती करत होता मानसिक आणि शारीरिक छळ
    कळमेश्वर तालुक्यातील पीडित तरुणीचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघे काही दिवस घरीच राहिले. परंतु लव्ह मॅरेज करून दिल्यानंतरही मुलगा काहीच काम करत नसल्याने वडिलांनी दोघाही घराबाहेर काढले. नतर दोघेही मध्य प्रदेशातील वडचिचोली येथे राहू लागले. मात्र, लग्नाआधी प्रेम फुलवणारा पती, पीडितेला मानसिक आणि शारीरिक छळ करू लागला. एवढेत नाही तर त्याने पत्नीचा अश्लील व्हिडीओ देखील तयार केला होता. अखेर पीडिता, पतीच्या जाचाला कंटाळून आपल्या माहेरी निघून गेली. पत्नी माहेरी गेल्याची बाब आरोपी पतीला खटकली आणि त्याचे पित्त खवळले. त्याने पत्नीची बदनामी करण्यास सुरुवात केली. त्याने पत्नीचा अश्लिल व्हिडीओ थेट फेसबुकवर पोस्ट केला.

    दरम्यान, पीडितेने पतीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. ही बाब आरोपीला समजताच त्याने कळमेश्वर बस स्थानक परिसरात पीडित पत्नीवर ब्लेडने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पीडित पत्नीच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत केली. सध्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.husband shared her wifes personal video on Facebook

Post a Comment

 
Top