0
पूजेत बसलेले इतर मांत्रिक उठले आणि त्यांनी महिलेच्या अंगावरील वस्त्र अक्षरश: फाडले.

औरंगाबाद- कन्नड तालुक्यात पूजेच्या बहाण्याने महिलेला शेतात बोलवून तिच्यावर मांत्रिकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेली माहिती अशी की, कन्नड तालुक्यात एका शेतात बांधलेल्या घरात 'कलंकी' पूजेचे आयोजन करण्‍यात आले होते. रामभाऊ शिंदे नामक व्यक्तीने पीडित महिलेला पूजेसाठी आपल्यासोबत नेले होते. पूजेत काही मांत्रिक बसले होते. ते मोठ-मोठ्याने मंत्र उच्चारत होते. त्यापैकी एका मांत्रिकाने पीडितेला विवस्र होण्यास सांगितले. महिलेने विरोध केल्यास पूजेत बसलेले इतर मांत्रिक उठले आणि त्यांनी महिलेच्या अंगावरील वस्त्र अक्षरश: फाडले. एवढेच नाही तर तिच्यासोबत अश्लील कृत्य करु लागले.

पोलिसांना सांगितली आपबीती...
पीडितेने मांत्रिकांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून थेट पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांना झालेला प्रकार सांगितला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.Woman stripped forcefully in Kannad Aurangabad

Post a comment

 
Top