0
एखाद्या लोभी किंवा मूर्ख व्यक्तीकडून एखादे खास काम करून घ्यायचे असल्यास कसे करावे? चाणक्यांनी सांगितले आहे एका नीतीमध्ये

आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतींंच्या माध्यमातून सुखी आणि यशस्वी जीवनाचे विविध सूत्र सांगितले आहेत. या नीतीचे पालन केल्यास व्यक्ती आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो. आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अनेकवेळा आपल्याला इतरांची मदत घ्यावी लागते. या संदर्भात आचार्यांनी एक नीती सांगितली आहे. या नीतीमध्ये चाणक्यांनी आपण एखाद्या व्यक्तीकडून कशाप्रकारे आपले काम करून घेऊ शकतो, याविषयी सांगितले आहे.


आचार्य चाणक्य म्हणतात...
लुब्धमर्थेन गृह्णियात् स्तब्धमंजलिकर्मणा।
मूर्खं छन्दानुवृत्त्या च यथार्थत्वेन पण्डितम्।।


आचार्य चाणक्य सांगतात की, आपल्या जवळपास अनेक प्रकारचे लोक असतात. त्यामधील काही पैशाचे लोभी असतात. लोभी व्यक्तीला वश करण्याचा साधा सरळ मार्ग म्हणजे त्याला धन देऊन वश करता येते.


येथे सांगण्यात आलेल्या नितीमधील दुसरा व्यक्ती अहंकारी आहे - जर एखादा व्यक्ती अहंकारी असेल आणि नेहमी इतरांना कमीपणा दाखवण्याच्या प्रयत्नात राहत असेल तर त्याच्यासमोर हात जोडून त्याला मान-सन्मान द्यावा. अशा मान-सन्मानामुळे अहंकारी व्यक्ती प्रसन्न होतो आणि नकळतपणे तुमच्या वशमध्ये येतो.


तिसरा व्यक्ती आहे मूर्ख - एखाद्या मूर्ख व्यक्तीला वश करण्यासाठी आपण तेच काम करावे जे त्याला आपेक्षित आहे. वेळोवेळी मूर्ख व्यक्तीची प्रशंसा करावी. असे केल्यास तो तुमची प्रत्येक गोष्ट मान्य करेल आणि तुम्हाला त्रासही देणार नाही.


चौथा व्यक्ती आहे बुद्धिमान - एखाद्या बुद्धिमान व्यक्तीला वश करणे फार अवघड काम आहे. बुद्धिमान व्यक्तीला वश करण्यासाठी आपणही बुद्धीचा वापर केला पाहिजे. बुद्धिमान व्यक्तीसमोर नीती आणि ज्ञानाच्या गोष्टी केल्यास तोसुद्धा वश होऊ शकतो.chanakya niti in Marathi about success

Post a comment

 
Top