0
आरोपी पोपट होळकर यांने दादासाहेब यांना मारण्याची धमकी देत कामावर नेले.

अहमदनगर- मालकाच्या जाचाला कंटाळून वाहलचालकाने आत्महत्या केल्याची घटना पारनेर तालुक्यातील दैठणागुंजाळ गावात घडली आहे. या प्रकरणी पोपट रखमादी होळकर(रा. नेप्ती, ता. नगर) याच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त् करण्याचा गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणी मयत दादासाहेब भाऊसाहेब गुंजाळ(30)(रा. दैठणेगुंजाळ ता. पारनेर) यांची पत्नी संगीता गुंजाळ यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यात त्यांनी सांगितले की, दादासाहेब गुंजाळ हे पोपट होळकर यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करायचे.

एक दिवस दादासाहेब कामावर न गेल्यामुळे मालक त्यांच्या घरी आला आणि कामावर का आला नाहीस अशी विचारणा केली. त्यावर दादासाहेब यांनी यापुढे येणार नाही, दुसरा चालक पाहा असे सांगितले.

त्यानंतर आरोपी पोपट होळकर यांने दादासाहेब यांना मारण्याची धमकी देत कामावर नेले. रात्री कामावरून घरी परतल्यावर त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

त्यानंतर त्यांना तत्काळ तारकपूर येथील खासगी रूग्णालयात भर्ती करण्यात आले, पण उपचारादरम्यान 26 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यु झाला. या प्रकरणी संगीता गुंजाळ यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पुढील तापस पोलिस निरीक्षक बाजीराव पवार करत आहेत.
Driver committed suicide

Post a Comment

 
Top