0
घटनेची देवणी ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

औरंगाबाद- शेतीच्या वादातून झालेल्या खुनाच्या घटनेत २००५ मध्ये उदगीर सत्र न्यायालयाने लातूर जिल्ह्यातील दहेठाणा (ता. शिरुर अनंतपाळ) गावातील दहापैकी चौघांना निर्दोष मुक्त केले होते. परंतु या निवाड्याच्या विरोधात शासनाने खंडपीठात अपील केले असता १३ वर्षांपूर्वीचा सत्र न्यायालयाचा निकाल खंडपीठाने रद्द ठरवून दहापैकी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या घटनेत बचावात्मक पावित्र्यात खून झाल्याची सबब ग्राह्य धरता येणार नसून, आरोपींनी बचावात्मक पावित्र्याच्या सर्व सीमा ओलांडल्याचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी निकालात स्पष्ट केले आहे.

नामदेव नागप्पा काकनाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २५ जून २००० रोजी शेतीच्या वादावरून त्यांचे पुत्र बब्रुवान काकनाळे यांचा खून करण्यात आला. यात फिर्यादीचे दोन मुले अनुक्रमे अंकुश व रामदास जखमी झाले आहेत. मधुकर नामक मुलगा गावी गेल्याने तो घटनास्थळी नव्हता. चुलती अनुसया हिच्या मुलीच्या लग्नानंतर तिने शेतजमीन आपल्या नावे केल्याने दहा जणांनी हल्ला केला. घटनेची देवणी ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच फेब्रुवारी २००५ मध्ये सत्र न्यायालयाने बचावात्मक पावित्र्यात खून झाल्याचे ग्राह्य धरून दहा जणांची निर्दोष मुक्तता केली. याविरोधात राज्य शासनाच्या वतीने खंडपीठात अपील करण्यात आले. शासनाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील महेंद्र नेर्लीकर यांनी युक्तिवाद करताना प्रत्यक्षदर्शी पुराव्यांवर भर दिला. सख्खे भाऊ घटनेत जबर जखमी आहेत. परिस्थितीजन्य पुरावा मयताच्या बाजूने असून घटनास्थळाचा पंचनामा, हत्यारही जप्त केले, कपड्यावर असलेले रक्ताचे डाग हे खून केल्याचे सिद्ध करतात, असे ते म्हणाले.

असा फिरवला निकाल
बचावात्मक पावित्र्यात जीवे मारण्याचा प्रयत्न होत नाही. शेतात हाणामारी झालेली असून सहा जण प्रत्यक्षदर्शी होते, असेही याप्रसंगी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. खंडपीठाने भादंवि कलम ३०२ सह १४९ अन्वये जन्मठेपेची शिक्षा, भादंवि कलम ३०७ नुसार पाच वर्षे सक्तमजुरी, ३२४ नुसार तीन महिने शिक्षा सुनावण्यात आली. जन्मठेप झालेल्यांमध्ये सूर्यभान गोविंदराव हुल्ले, गहिणीनाथ हुल्ले, पंडितकुमार हुल्ले व महेंद्रकुमार हुल्ले आदींचा समावेश आहे.
Penalty imprisonment for Murderer  in Aauranangabad

Post a Comment

 
Top