आत्मदहन करणाऱ्या युवकाच्या काकांची खंत; पाेलिस- प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवरही टीका
पुणे- ‘कर्जत (जि. नगर) येथील दावल मलिक ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ ताैसिफ शेख याने गुरुवारी नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आत्मदहन केले. ताैसिफ याने प्रशासनाला आत्मदहनाची पूर्वकल्पना देऊनही त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले,’ अशी खंत ताैसिफचे काका राजू कलिंदर शेख यांनी व्यक्त केली. ‘ताैसिफ राॅकेल ओतून घेत पेटवून घेईपर्यंत आणि नंतर जळत असताना परिसरात उपस्थित असलेल्या शेकडाे लाेकांनी त्याचे फाेटाे, व्हिडिओ काढले.... मात्र, डाेळ्यादेखत मृत्यूला कवटाळत असलेल्या एका तरुणाला वाचवावे, असे काेणास वाटले नाही. गंभीर भाजल्याने ताैसिफला पुण्याला हलवण्यात आले. रुग्णालयात नेण्यात येत असताना अॅम्ब्युलन्समध्ये ‘माझा जीव वाचवा’ अशी आर्त हाक ताे देत हाेता. मात्र, त्याचा उपयाेग झाला नाही. एरवी राॅकेलच्या कॅनमध्ये पाणी भरून घेऊन येणाऱ्यांना पाेलिस तत्काळ अटकाव करतात, मात्र जे अन्यायाविराेधात खरा लढा देतात, प्राण पणाला लावतात, अशा घटनेच्या वेळी फाेटाे काढत बसण्यापेक्षा प्रशासन व बघ्यांनी त्याचा जीव वाचवला असता तर आज ताैसिफ वाचला असता,’ असे शेख म्हणाले. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे एका पत्रकाराने त्याचा वाचवण्याचा प्रयत्न केला, हे दिलासादायक असल्याचे राजू म्हणाले.
रास्ता राेकाे, बंदमुळे तणाव
तौसिफच्या मृत्यूनंतर कर्जत, नगरमध्ये शुक्रवारी तीव्र पडसाद उमटले. मुस्लिम समाजाने रस्ता राेकाे करुन, कर्जत शहर बंद ठेवून निषेध केला. अतिक्रमण काढल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्राही घेतला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. अखेर प्रशासनाने दावल मलिक ट्रस्टच्या जागेतील अतिक्रमण हटवले. त्यानंतर ताैसिफचा मृतदेह दफन करण्यात आला.
रिक्षाचालक जळत हाेता, लाेक शूटिंगमध्ये गुंतलेले
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात १२ डिसेंबर राेजी अशाच संवेदनाहीन प्रसंगाचा अनुभव अाला. दुपारी ४ वाजता सीएनजी रिक्षा व जीपची धडक झाली. त्यामुळे रिक्षाने अचानक पेट घेतला. या घटनेत रिक्षाचालक किशाेर गाेकुळ नरके (२७) गंभीररीत्या भाजला. आगीमुळे रिक्षातून बाहेर पडणे चालकाला शक्य झाले नाही, आगीच्या ज्वालांनी लपेटलेल्या अवस्थेत ताे काही क्षणांत रस्त्यावर काेसळला. मात्र, त्याला वाचवण्यासाठी चार-दाेनच लाेकांनी धावपळ केली. रस्त्यावरील इतर शेकडाे लाेक मात्र माेबाइलवर व्हिडिओ, फाेटाे काढण्यात गुंतलेले दिसले. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना १५ डिसेंबर राेजी किशाेरचा मृत्यू झाला. मात्र बघ्यांची वेळीच ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले असते तर कदाचित किशाेरचाही जीव वाचला असता.
फाेटाेचे आकर्षण क्षणिक, जीव वाचवणे माेलाचे
पाेलिस निरीक्षक राजेंद्र जाधव म्हणाले, ‘रिक्षाचालक जळत असताना फाेटाे काढणारे त्याला वाचवण्याची जबाबदारीच विसरून गेले. लाेकांच्या अशा मानसिकतेत बदल हाेऊन त्यांनी मदतीकरिता तातडीने धावून जाणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे काेणी व्हिडिओ, फाेटाे काढणारे व्यक्ती असतील आणि त्यांच्याविराेधात काेणी तक्रार दाखल केल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. एखाद्या माणसाचा जीव वाचला तर त्याचे कुटुंब वाचते, आपल्या व्हिडिओ, फाेटाेचे आकर्षण हे क्षणिक असते, हे लाेकांनी समजून घेतले पाहिजे.’
सामाजिक अशांतता निर्माण केल्यास तीन वर्षे कैद
> एखाद्याचा जीव धाेक्यात असेल तर त्याला वाचवणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, अशाप्रसंगी काही जण माेबाइलवर घटनेची व्हिडिओ क्लिप करून ती साेशल मीडियावर व्हायरल करतात. ।अशा लाेकांवर भादंवि किंवा आयटी कायद्यात कारवाईची तरतूद कायद्यात नाही. मात्र, अशा प्रकारची क्लिप किंवा फाेटाेत छेडाछाड केली अथवा सामाजिक भावना भडकावल्या, घबराटीचे वातावरण निर्माण केले किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला तर आयटी अॅक्टनुसार तीन वर्षे कैद आणि दंडाची तरतूद आहे. माेबाइलच्या माध्यमातून क्लिप किंवा फाेटाे व्हायरल करून सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्या समाजकंटकांचा शाेध घेऊन त्यांच्यावर पाेलिसांनी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.'- अॅड. विजय ठाेंबरे, पुणे
जबाबदारी नकाे असल्याने वाढतात अशा विकृती
आभासी जगात राहण्यात कोणतीही जबाबदारी नसते. मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असते... त्यामुळे व्हर्च्युअल जगाने मानवी मनाचा मोठा कप्पा व्यापला आहे. सनसनाटीमुळे किंवा सेन्सेशनमुळे मेंदू उत्तेजित होतो. प्रत्येकाला अशा उत्तेजनाचे आकर्षण आहे. आपण काही तरी उत्तेजनात्मक करताे, तशी पाेस्ट टाकताे किंवा पाहताे याभोवतीच माणूस केंद्रित झाला. या गोष्टी त्याला जिवंत असण्याचा अनुभव देतात. शिवाय संवेदनशीलताही कमी झाली आहे. काेणालाच जबाबदारी नको आहे. त्यामुळे अशा घटनांच्या वेळी माणसाला वाचवण्यापेक्षा त्याचे शूटिंग करून सर्वात आधी सोशल मीडियावर टाकणे काही लाेकांना महत्त्वाचे वाटते.

Post a Comment