कल्याण मेट्राे प्रकल्पाचे श्रेय शिवसेनेला मिळू नये यासाठी हा साेहळा ठाण्याएेवजी कल्याणमध्ये होत अाहे.
मुंबई- कल्याण मेट्राे रेल्वे प्रकल्पाचा भूमिपूजन साेहळा १८ डिसेंबर राेजी पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या हस्ते हाेणार अाहे. मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अद्याप पाठवण्यात अाले नसल्याने युतीतील विसंवादाची चर्चा पुन्हा रंगली अाहे. कल्याण मेट्राे प्रकल्पाचे श्रेय शिवसेनेला मिळू नये यासाठी हा साेहळा ठाण्याएेवजी कल्याणमध्ये होत अाहे.
वास्तविक ठाणे- कल्याण-भिवंडी या मेट्राे रेल्वेचा भूमिपूजन साेहळ्याचा कार्यक्रम ठाण्यातच व्हावा असा शिवसेनेच्या नेत्यांचा अाग्रह हाेता. परंतु भाजपचे स्थानिक नेते राज्यमंत्री रवींद्र चव्हाण अाणि खासदार कपिल पाटील यांच्या अाग्रहास्तव हा कार्यक्रम कल्याणमध्ये हाेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अाहेत. त्यांच्याच खात्यामार्फत समृद्धी महामार्गाचे काम सुरू असल्याने या साेहळ्यात शिंदेंची उपस्थिती अपरिहार्य अाहेच. कल्याण मेट्राेच्या कार्यक्रमाच्या वेळीच समृद्धीचेही भूमिपूजन करण्याचे नियाेजन सरकारने केले हाेते. मात्र शिवसेना-भाजपमधील श्रेयवादाच्या मुद्यावरून हा कार्यक्रम अाता जानेवारीत करण्याचे राज्य सरकारने ठरवले अाहे. यापूर्वीही माेदींच्या उपस्थितीत झालेल्या नवी मुंबई विमानतळ भूमिपूजन कार्यक्रमातही ठाकरेंना निमंत्रण दिले नव्हते.

Post a Comment