0
सातारा जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय आहे. या मंत्रालयामध्ये जाण्याकरता दोन प्रवेशद्वार अधिकृत आहेत. त्या दोन्हीही प्रवेशद्वारावर असलेल्या कमानीची अंत्यत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे कमानीतून आतमध्ये जातानाच दुर्घटना होण्याची शक्यता सर्वसामान्यांतून व्यक्त होवू लागली आहे. जिल्हा परिषदेत अनेक अधिकारी, पदाधिकारी यांच्या केबीनसह नवीन झाल्या आहेत. पार्किगमध्येही बदल केला आहे. असे असताना दोन्ही काम का बदलत नाहीत, असाही सुर उमटू लागला आहे.
सातारा जिल्हा परिषदेत अलिकडच्या दोन वर्षात अनेक बदल झाले आहेत. अनेक अधिकारी आणि पदाधिकाऱयांच्या केबीनमध्ये स्टाईलची फरशी बसवण्यात आली. अनेक विभागात नव्याने फर्निचर आणले गेले. इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली. तसेच पार्किंगकरता छत्र उभारले गेले. तसेच कॅन्टीनची इमारतीची दुरुस्ती करण्यात आली. असा लाखो रुपयांचा निधी खर्च करुन जिल्हा परिषदेत ही कामे करण्यात आली आहेत. असे असताना जिल्हा परिषदेत मात्र आपल्या सोयीनुसार काम करण्याची पद्धत सुरु झाली आहे. त्यामुळे जे काम गरजेचे आहे. त्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या दोन्हीहीही म्हणजेच इन आणि आऊट गेटला दोन कमानी आहेत. या दोन्हीही कमानी गंजलेल्या आहेत. फार जुन्या झालेल्या आहेत. त्या कमानीतून आतबाहेर करताना दुखद घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्याने त्या कमानी बसवण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.

Post a Comment

 
Top