0
रेस्तरांच्या माहितीनुसार, १५०० लोकांवर झालेल्या संशोधनात पालकांनी सांगितले, जेवण करताना ते फोन पाहत असतात                                                                                                                                    लंडन - अमेरिकी फॅमिली रेस्तरां चेन फ्रँकी व बेनीने रेस्तरांला शुक्रवारपासून 'नो फोन झोन' लागू केला आहे. रेस्तरांच्या प्रवक्त्याने सांगितले, आम्ही कुटुंबीयांना वेळ देता यावा, म्हणून हा निर्णय घेतला आहे. या योजनेत मुलांसह आलेल्या पालकांना आपले फोन व टॅब्लेट रेस्तरांमध्ये जमा करावे लागतात. त्याऐवजी त्यांना मोफत जेवण द्यावे लागत आहे. सध्या ही आॅफर ९ डिसेंबरपर्यंत सर्व इटालियन-अमेरिकन साखळीतील २५० रेस्तरांमध्ये उपलब्ध आहे. परंतु ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास तो वाढवला जाऊ शकतो. नुकतेच त्यांनी एक संशोधन पाहिले होते. यात पालक स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मुलांना वेळ देत नाहीत, असे आढळून आले होते, असेही प्रवक्त्यांनी सांगितले.

रेस्तरांच्या माहितीनुसार, १५०० लोकांवर झालेल्या संशोधनात पालकांनी सांगितले, जेवण करताना ते फोन पाहत असतात, तर १० पैकी एका मुलाने म्हटले, आम्हाला त्यांनी वेळ द्यावा म्हणून जेवताना त्याने पालकांचा फोन लपवला होता. यानंतर आम्ही हा निर्णय घेतला.

मुलांचे कोच सुई अटंकिस यांनी सांगितले, रेस्तरांच्या निर्णयामुळे आम्ही खूप खुश आहोत. आजकाल आम्ही २४ तास डिजिटल जगात असताे. कुटुंबीयांसाठी वेळ कसा काढावा, याचा आम्हाला विचार करावा लागतो. जोपर्यंत आम्ही काही योजना आखत नाही, मुलांना वेळ देणे कठीण आहे
london no phone zone Hotel

Post a Comment

 
Top