0
विक्रम प्रस्थापित करण्यासाठी नव्हे तर यासाठी करत आहे स्कायडायव्हिंग

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियातील इरेने ओशिया या १०२ वर्षांच्या महिलेने १४ हजार फूट उंचीवरून उडी घेत जगातील सर्वाधिक वयाच्या महिला स्कायडायव्हरचा जागतिक विक्रम नाेंदवला अाहे. मला २२० किमी वेगाने डाइव्ह करताना काहीही भीती वाटली नाही, असे दक्षिण ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या इरेने यांनी सांगितले. यापूर्वी इरेने यांनी स्वत:च्या १०० व्या वाढदिवसाला स्कायडायव्हिंग केले हाेते. १०२ वर्षे व १९४ दिवसांच्या वयात त्यांनी यशस्वीरीत्या डाइव्ह केले, असा दावा अायाेजकांनी केला अाहे.

स्कायडायव्हिंगद्वारे चॅरिटीसाठी उभारले पैसे

कोणाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी नाही तर याद्वारे मोटर न्यूरॉन आजारावर रिसर्च करण्यासाठी पैसे गोळा करत असल्याचे इरेने यांनी सांगितले. 10 वर्षापूर्वीच या आजारामुळे त्यांच्या शेलाघ या मुलीचा मृत्यु झाला होता. त्यामुळे या आजारावर रिसर्च करण्यासाठी पैसे गोळा करण्याचे त्यांनी ध्येय ठरवले. इरेने 2016 मध्ये स्कायडायव्हिंगच्या माध्यमातून चॅरिटीसाठी 12 हजार डॉलर (8.5 लाख रूपये) गोळा केले होते. त्यांनी या उडीद्वारे देखील 10 हजार डॉलर (7.2 लाख रूपये) गोळा करण्याचे लक्ष ठेवले आहे.102 year old woman becomes the oldest skydiver in the world

Post a comment

 
Top