0

छोट्या परीला पाहण्यासाठी रोहित मुंबईच्या दिशेने रवाना.

  • स्पोर्ट्स डेस्क- मेलबर्नमध्ये भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर काही तासांतच रोहित शर्माला एक आनंदाची बातमी मिळाली. रोहित शर्माला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. रोहितला ही बातमी कळताच तो तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाला.
    मीडिया रिपोर्टनुसार, रोहित 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अंतिम कसोटी सामन्यात खेळणार नसल्याची शक्यता आहे. भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या कसोटी सामन्यात रोहितची जागा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या घेणार आहे.
    रितिकाची चुलत बहीण आणि अभिनेता सोहल खानची पत्नी सीमा खान हीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन ही गोड बातमी शेअर केली. सीमाने रितिकासोबत एक फोटो शेअर करुन 'बेबी गर्ल, पुन्हा एकदा मावशी झाली' अशाप्रकारची पोस्ट लिहिली. रोहित आपल्या लाडक्या परीला पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियावरुन भारताकडे रवाना झाल्यामुळे 3 डिसेंबरच्या सिडनीमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सहभागी होवू शकणार नाही.Rohit Sharma blessed with a baby girl

Post a Comment

 
Top