0
आपल्या बोल्ड अभिनयाने अल्पवधीत हीट झालेली अक्ट्रेस माही गिलने नुकताच बर्थडे साजरा केला..

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड अभिनयाने अल्पवधीत हीट झालेली अक्ट्रेस माही गिलने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला आहे. 19 डिसेंबर 1975 रोजी चंदीगड येथे जन्मलेल्या माहीने आता वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. मुळची चंदीगडच्या असणा-या माहीने 2003 साली 'हवाएं' या पंजाबी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. अनुराग कश्यप यांच्या देव डी या चित्रपटातून तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली होती. देव डी, साहेब बीवी और गँगस्टर या चित्रपटांमध्ये अभिनय करुन माहीने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयासोबतच तिने निर्मिती क्षेत्रातही नशीब आजमावले आहे. 'आतिशबाजी इश्क' या पंजाबी चित्रपटाची तिने निर्मिती केली आहे.

खरे नाव आहे रिम्पी...
- माहीचे खरे नाव रिम्पी गिल कौर आहे. 
- पंजाब युनिव्हर्सिटीतून माहीने मास्टर डिग्री घेतली आहे.
घटस्फोटित आहे माही..
- कमी वयातच माहीचे लग्न झाले होते. याविषयी स्वतः माहीने एका मुलाखतीत सांगितले होते.
- माही म्हणाली होती, की माझे पहिले लग्न खूप लवकर झाले. त्यावेळी मी मॅच्युअरदेखील नव्हते. पण फार काळ हे लग्न टिकले नाही आणि तिने नव-यापासून घटस्फोट घेतला.
- 41 वर्षीय माही गोव्याच्या एका हॉटेल ओनरला डेट करत असल्याची चर्चा आहे.
mahi gill recently celebrated her birthday

Post a Comment

 
Top