0
या मंदिरामध्ये भक्तांपेक्षा जास्त काळे उंदीरच दिसतात आणि या काळ्या उंदरांमध्ये एखादा पांढरा उंदीर दिसला तर सर्व इच्छा

भारत हा आस्था आणि विश्वासाचा देश आहें. हिंदू धर्मात मंदिरात जाणे आणि पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. काही मंदिर असेही आहेत जे फक्त इच्छापूर्तीच करत नाहीत तर आपल्या अनोख्या चमत्कारिक विशेषतेमुळे ओळखले जातात. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही प्राचीन आणि चमत्कारिक मंदिरांची माहिती देत आहोत. येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू परंतु या मंदिरांच्या खास गोष्टी तुम्हाला विचार करायला भाग पाडू शकतात...


करणी देवी मंदिर -
करणी देवी मंदिर राजस्थानमधील बिकानेर शहरापासून थोड्या अंतरावरील देशनोक स्थानावर स्थित आहे. हे ठिकाण मूषक मंदिर नावानेही ओळखले जाते. या मंदिराची विशेषता म्हणजे येथे भक्तांपेक्षा जास्त काळे उंदीरच दिसतात आणि या काळ्या उंदरांमध्ये एखादा पांढरा उंदीर दिसला तर भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. या मंदिरात आलेलं भक्त उंदरांना दुध, लाडू खायला ठेवतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिराच्या बाहेर पडताच तुम्हाल एकही उंदीर दिसणार नाही. या मंदिरात मांजर कधीही प्रवेश करत नाही. येथील मान्यतेनुसार, जेव्हा 'प्लेग' रोगाने थैमान घातले होते तेव्हा हे मंदिरच नाही तर हा संपूर्ण भाग या रोगापासून सुरक्षित होता.


मेहंदीपुर बालाजी -
राजस्थानमधील मेहंदीपुर बालाजीचे मंदिर श्री हनुमानाचे एक जागृत स्थान मानले जाते. या मंदिरात विराजित असलेले श्री बालाजी आपल्या दैवी शक्तीने दुष्ट आत्म्यांच्या बाधेतून मुक्त करतात असे मानले जाते. भूतबाधेने त्रस्त झालेले हजारो लोक या मंदिरात दररोज दर्शनासाठी येतात. भूतबाधेने पिडीत असलेल्या व्यक्तीला हे मंदिर स्वतःच्या घराप्रमाणे वाटते आणि श्री बालाजी या संकटातून मुक्ती देतील अशी त्याची शेवटची आशा असते. येथे अनेक लोक साखळदंडामध्ये बांधलेले आणि उलटे लटकलेले दिसून येतात. हे मंदिर आणि येथील चमत्कार पाहून कोणताही व्यक्ती चकती झाल्याशिवाय राहत नाही. संध्याकाळी जेव्हा श्री बालाजीची आरती सुरु होते तेच पिडीत लोक स्वतःशी झुंजताना दिसतात आणि आरती झाल्यानंतर मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करतात. तेथील पुरोहित काही उपाय करतात आणि त्यानंतर पिडीत व्यक्ती स्वस्थ होते असे मानले जाते.


कालभैरव मंदिर -
मध्य प्रदेशातील उज्जैन शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर कालभैरव मंदिर स्थित आहे. भगवान कालभैरवाला मद्याचा (दारू) नैवेद्य दाखवला जातो. मद्याचा ग्लास कालभैरव मूर्तीच्या तोंडाला लावताच पाहता पाहता ग्लास रिकामा होतो. हे मद्य कुठे जाते हे अजूनही एक रहस्यच आहे. मंदिराच्या बाहेर भगवान कालभैरवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आठ ते दहा दारूचे दुकान आहेत.


तवानी मंदिर -
हिमाचल प्रदेशातील धर्मशाळापासून 25 किलोमीटर अंतरावर ततवानी मंदिर स्थित आहे. धर्मशाळा ठिकाणाला येथील पाण्याच्या कुंडांमुळे ओळखले जाते. या मंदिराच्या बाहेर गरम पाण्याचे एक कुंड आहे. या कुंडात स्नान केल्यानंतरच भाविक मंदिरात प्रवेश करू शकतात. कुंडातील पाण्यामध्ये शरीरासाठी लाभदायक तत्त्व असल्याचे मानले जाते.


स्तंभेश्वर महादेव मंदिर -
स्कंद पुराणात स्तंभेश्वर मंदिराचे वर्णन आढळून येते. महिसागर संगम तीर्थावर ही पवित्र पावन भूमी भगवान शंकराच्या परम पराक्रमी पुत्र कार्तिकेय स्वामी यांनी स्थापित केली आहे. या शिवलिंगाच्या केवळ दर्शनाने भक्ताचे सर्व दुःख दूर होतात असे मानले जाते. हे मंदिर गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील कावी-कम्बोइ समुद्र तटावर स्थित आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे, हा समुद्र दिवसातून दोन वेळेस श्री स्तंभेश्वर महादेवाला स्वतः अभिषेक करतो.
amazing facts for hindu temple in india

Post a Comment

 
Top