0
लोकप्रिय कॉमेडी शो 'जिजाजी छतपर हैं' आपल्या प्रेक्षकांना पंचम (निखील खुराना) आणि इलायची (हिबा नवाब) या लोकप्रिय व्यक्तिरेखांसोबत प्रेमाची नवीन अनुभूती देण्यासाठी सज्ज आहे. पंचम आणि इलायची आपल्या भावना एकमेकांकडे व्यक्त करणार आहेत. आगामी एपिसोड्समध्ये मुरारी (अनुप उपाध्याय)ला एक पत्र मिळते‚ ज्यात पंचमच्या इलायचीबाबतच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.

या बहरत्या प्रेमाची माहिती नसलेला छोटे इलायचीसाठी मुरारीच्या मान्यतेने लग्नासाठी मुलगे आणत आहे. यामुळे घाबरलेली इलायची पंचमला आपल्या वडिलांचा सामना करण्यासाठी आणि आपल्या दोघांबाबतचे सत्य सांगण्यासाठी सांगते. त्यामुळे तो इलायचीबाबतच्या आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी पत्र लिहितो. या नाटकात भर घालताना हे पत्र गच्चीवरून थेट मुरारीच्या हातात पडते. आपल्या मुलासाठी इलायचीला मागणी घालण्यासाठी आलेले जोडपे पंचमने ज्या मुलीचे थिएटरमध्ये चुंबन घेतले ती इलायची असल्याचे ओळखते आणि तेव्हाच गोष्टीला वेगळे वळण मिळते.

इलायची आणि पंचमची प्रेमकथा सत्य सांगून संपुष्टात येईल का?

मुरारीच्या भूमिकेतील अनुप उपाध्याय म्हणाला, 'जिजाजी छत पर हैं' हा शो एक खास प्रेमकथा विनोदी ढंगाने सादर करतो. या कार्यक्रमाला आपल्या प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम पाहणे ही आनंददायी गोष्ट असून आमचे सर्वोत्तम देण्यासाठी आम्हाला त्यामुळे प्रेरणा मिळते. तथापि, इतके छान कलाकार आणि कर्मचारी यांच्यासोबत सेटवर काम करताना खूप धमाल येते.'

Post a Comment

 
Top