0
पत्नीने तक्रार दिल्यानंतर दोन महिन्यांनी उघडकीस

पुणे- शाळेत मुलांना शिक्षा केल्याने संतप्त पालकांनी बेदम मारहाण केल्याने मुख्याध्यापकाने कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी घडलेली ही घटना मृत मुख्याध्यापकाच्या पत्नीने सिंहगड पोलिसांत तक्रार दिल्यानंतर उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक कावरे (४९, रा. सिंहगड रस्ता) असे मृत मुख्याध्यापकाचे नाव आहे. कावरे यांच्या पत्नी वर्षा यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार नवनाथ पारगे, बाळासाहेब पारगे आणि तीन महिलांविरोधात (सर्व रा. डोणजे गाव, ता. हवेली) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अशोक कावरे डोणजे येथे शाळेत मुख्याध्यापक होते. शाळेतील मुलांना त्यांनी अभ्यास न केल्याने २४ सप्टेंबर रोजी शिक्षा केली होती. शिक्षा केल्याने पालक पारगे, कुंभार, चव्हाण शाळेत आले. त्यांनी शाळेत सर्वांसमोर कावरेंना बेदम मारहाण केली. मारहाणीच्या घटनेमुळे त्यांना मानसिक धक्का बसला. अपमानित झाल्याने त्यांनी सिंहगड रस्ता भागातील कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली, असे वर्षा कावरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पतीच्या निधनानंतर मी आजारी पडले. आजारपणातून सावरल्यानंतर माझ्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार कावरे यांनी दिली.

त्यानंतर पोलिसांनी संबंधित पालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांनी मृत मुख्याध्यपाकाला कशाप्रकारे मारहाण केली याचा तपास पोलिस करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
School principle get suicide

Post a comment

 
Top