0
ही भाजप व राष्ट्रवादीची खेळी आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

 • नगर- महापौरपदाच्या निवडणुकीत शिवरायांबद्दल अपशब्द काढणार्‍या श्रीपाद छिंदम याला शुक्रवारी सभागृहात शिवसेनेच्या नगरसेवकांनी बेदम चोप दिला. छिंदम याने शिवसेनेला मतदान केल्याच्या रागातून त्याला मारहाण केल्याचे समजते. तसेच त्याचे मतदानही नाकारण्यात आले आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेसची खेळी असल्याचा आरोपीही शिवसेनेने केला आहे. छिंदमला मारहाण करणार्‍या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिले आहेत.
  मिळालेली माहिती अशी की, महापालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदम अपक्ष म्हणून निवडून आला आहे. तो कोणाला मतदान करणार याची उत्सुकता होती. त्याने सेनेने उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी हात उंचावला. त्यावेळी सेनेच्या नगरसेवकांनी त्याला सभागृहातच मारहाण केली. सेनेने पुढील निवड प्रक्रियेवर बहिष्कार घालत सभात्याग केला. आम्ही छिंदमचे मत मागितले नव्हते.
  महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे यांची निवड
  महापौर व उपमहापौरपदासाठी शुक्रवारी अहमदनगर महापालिकेच्या सभागृहात निवड प्रक्रिया झाली यावेळी महापूर पदाचे भाजपचे उमेदवार बाबासाहेब वाकळे विजयी झाला आहे.
  महापालिकेसाठी 9 डिसेंबरला 68 जागांसाठी निवडणूक झाली होती या निवडणुकीत सर्वाधिक 24 जागा घेऊन शिवसेना प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला होता. राष्ट्रवादी काँग्रेस 18 तर भाजपला अवघ्या 14 जागा मिळाल्या होत्या. परंतु महापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बहुजन समाज पक्ष यांनी एकत्र येऊन सभागृहात बहुमत सादर केल्याने महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे यांना संधी मिळाली आहे तर सर्वाधिक जागा घेणारा शिवसेना पक्ष मात्र आता विरोधी बाकावर बसणार आहे.
  भाजपचे खासदार दिलीप गांधी व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी छिंदमशी हातमिळवणी करुन मुद्यामहून आम्हाला बदनाम करण्यासाठी त्याला सभागृहात उपस्थित ठेवून सेनेला मतदान करायला लावले, असा आरोप सेनेचे बाळासाहेब बोराटे व युवराज गाडे यांनी केला आहे. या प्रकारामुळे सेनेने उपमहापौर पदाच्या निवडणुकीवरही बहिष्कार टाकण्याचे धोरण स्वीकारले. छिंदमला आम्ही सभागृहातच चोपले असा दावा सेनेने केला आहे. श्रीपाद छिंदमचे मत शिवसेनेच्या कोट्यात मोजण्यात आले आहे. सेनेला स्वत:चे 23 व छिंदमचे 1 आणि सपाचे 1 असे 25 मते मिळाली.Shripad Chhindam's polling to Shiv Sena; Sena chipped away in the hall Ahmednagar


Post a Comment

 
Top