0
1984 मधील शीख विराेधी दंगल प्रकरणात सज्जनकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली हाेती.

नवी दिल्ली- माजी खासदार सज्जन कुमार यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आत्मसमर्पण करण्यासाठी ३० दिवसांचा वेळ मागितला आहे. १९८४ मधील शीख विराेधी दंगल प्रकरणात सज्जनकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली हाेती.

सज्जनकुमार यांनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आत्मसमर्पणासाठी वेळ मागितला. त्यांच्या या मागणीला विराेध करण्यात येणार असल्याचे हा खटला लढवणारे वरिष्ठ वकील एच.एस. फुलका यांनी सांगितले. न्यायमूर्ती एस.मुरलीधर आणि न्यायमूर्ती विनाेद गाेयल यांनी १७ डिसेंबर राेजी सज्जनकुमार यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली हाेती. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले हाेते. यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने काँग्रेसचे नगरसेवक बलवान खाेखर, सेवानिवृत्त नाैदल अधिकारी कॅप्टन भागमल गिरधारी लाल आणि दाेघांना दाेषी ठरवत शिक्षा दिली हाेती. परंतु सज्जन कुमारला निर्दोष ठरवले हाेते.Sajjan Kumar File Petition in High Court

Post a Comment

 
Top