0

20 तास शास्त्रीय संगीत ऐकण्याची शिक्षा

 • एखादा गुन्हा केल्यावर तुम्हाला शिक्षा म्हणून बोर करण्यात आले तर... या शिक्षेचा अर्थ होतो की, तुम्हाला जे आवडत नाही तेच तुम्हाला करावे लागेल. एका शिकारीला एक वर्षे तुरुंगात ठेवून महिन्यातून कमीत कमी एक दिवश डिज्नीचे बाम्बी कार्टून पाहण्याची शिक्षा देण्यात आली. अमेरिकेतील मिसौरी येथे राहणारा डिविड बेरीला अनेक हरीणांची शिकार केल्यामुळे पकडण्यात आले होते. आता कार्टून बघून डेविडचे विचार बदलणार की नाही हे माहित नाही. पण अशी शिक्षा देण्याची ही पहिली वेळ नाही, अशा विचित्र शिक्षा ब-याच लोकांना देण्यात आल्या आहेत.
  गाढवासोबत मार्च काढण्याची शिक्षा
  2003 मध्ये शिकागोच्या दोन तरुणांना 45 दिवसांसाठी तुरुंगात राहण्यासोबतच आपल्या गृहनगरमध्ये एका गाढवासोबत मार्च करण्याचा आदेश देण्यात आला होता. क्रिसमसच्या पूर्व संध्येला या दोघांनी बाल ईसा मसीहची मुर्ती चोरली होती आणि नुकसान पोहोचवण्यात त्यांना दोषी मानण्यात आले होते. जेसिका लांग आणि ब्रायन पॅट्रिक त्यावेळी 19 वर्षांचे होते. त्यांना गाढवासोबत मार्च करत एक पोस्टर सोबत ठेवायचे होते. यावर लिहिले होते की, 'या वाईट गुन्ह्याचा पाश्चाताप आहे.'
  दहा वर्षे चर्चमध्ये जावे लागेल 
  ओकलाहोमामध्ये हाय स्कूलच्या एका विद्यार्थ्यावर एका व्यक्तीच्या मृत्यूचा गुन्हा होता. पण तो तुरुंगात जाण्यापासून वाचला. 2001 मध्ये 17 वर्षांचा टायलर एलरेड दारु पिऊन ड्राइव्ह करत होता, यामुळे अॅक्सीडेंटमध्ये त्याच्या एका मित्राचा मृत्यू झाला होता. विद्यार्थ्याला आदेश देण्यात आले की, तुला तुरुंगात जायचे नसेल तर तुला हाय स्कूल आणि ग्रॅज्यूएशन संपवावे लागेल, वर्षभर ड्रग, दारु आणि निकोटिन टेस्ट करावी लागेल. मृतकासाठी बनवलेल्या पॅनलमध्ये सहभागी व्हावे लागेल आणि दहा वर्षे चर्चमध्ये यावे लागेल.
  स्वतःच्या पायावर उभे राहून दाखवण्याची शिक्षा 
  स्पेनच्या एंडालूसियाचा एक तरुण आपल्या आई-वडिलांना पॉकेट मनी बंद केल्यामुळे कोर्टात घेऊन आला. हा 25 वर्षांचा तरुण आपल्या आई-वडिलांकडून दर महिन्याला 355 पाउंड मागत होता. मलागाच्या एका फॅमिली कोर्टाने तरुणाला शिक्षा सुनावली. त्याला 30 दिवसांच्या आत आई-वडिलांचे घर सोडायचे आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली.
  20 तास शास्त्रीय संगीत ऐकावे लागेल
  2008 मध्ये एंड्रयू वेक्टर याच्यावर कारमध्ये मोठ्या आवाजात संगीत ऐकल्यामुळे 120 पाउंडचा दंड ठोठावण्यात आला होता. तो आपले आवडते संगीत 'रॅप' ऐकत होता. जज म्हणाले की, दंडाची रक्कम कमी करुन 30 पाउंड करुन, पण त्याला 20 तास बीथोवन, बाख आणि शोपेन यांचे शास्त्रीय संगीत एकावे लागेल. वेक्टर फक्त 15 मिनिटेच ते संगीत ऐकू शकला. पण नंतर त्याने सांगितले की, त्याला बास्केटबॉलची प्रॅक्टिस करायची होती म्हणून त्याने हे संगीत मध्येच सोडले.weird punishment for crime

Post a Comment

 
Top