0
एका रात्रीत नशीब कसा पलटतो याची प्रचिती अमेरिकेतील क्लबमध्ये डान्स करणाऱ्या व्हेरॉनिका बेकहमला आली आहे.

एका रात्रीत नशीब कसा पलटतो याची प्रचिती अमेरिकेतील क्लबमध्ये डान्स करणाऱ्या व्हेरॉनिका बेकहमला आला. क्लबमध्ये येणाऱ्या एका कस्टमरने व्हेरॉनिकाला टिपमध्ये आपल्या आयुष्यभराची कमाई 1.5 कोटी रुपये दिले. या कस्टमर आणि डान्सरची भेट अवघ्या काही महिन्यांपूर्वीच झाली होती. तिने डान्सरचे काम सोडून फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वीच्या या घटनेनंतर व्होरोनिकाचे संपूर्ण आयुष्य बदलले. आता तिने पूर्वीचे काम सोडले असून ती नवे करिअर करत आहे.

- 34 वर्षीय स्ट्रिप डान्सर व्हेरॉनिकाची भेट मिकी लिऊ यांच्याशी 2014 मध्ये स्कोर्स स्ट्रिप क्लबमध्ये झाली होती.
- कोर्टात व्हेरॉनिकाने जमा केलेल्या कागदपत्रानुसार, दोघे लवकरच मित्र बनले आणि कधीच तुटणार नाही असे संबंध जुडले.
- आपल्या आणि लिऊ यांच्यात कधीच शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत. आपण दोघे केवळ मित्र होतो असा दावा तिने कोर्टात केला.
- ऑक्टोबर 2014 मध्ये ती काही कामानिमित्त न्यू जर्सी येथे गेली होती. त्या दरम्यान 35 दिवस ती लिऊ यांच्या घरात राहत होती.
- व्हेरॉनिकाने सांगितल्याप्रमाणे, फ्लोरिडाला परतली तेव्हा लिऊने तिला आपल्या अकाउंट आणि पॉलिसीमध्ये बेनिफिशिअरी म्हणून समाविष्ट केले.
- याच्या तीन दिवसांनंतर प्रेम व्यक्त करताना एक ईमेल सुद्धा पाठवला. कोर्टात दाखल पुराव्यानुसार, लिऊ यांनी तिला आपल्या रिटायरमेंट फंड, विमा इत्यादींचा वारस बनवले होते. त्यातून तिला 1.5 कोटी रुपये मिळाले आहेत.


काही महिन्यात झाला मृत्यू
- या घटनेच्या काही महिन्यातच लिऊ यांचा मृत्यू झाला. त्यांनी वयाची पन्नाशी सुद्धा गाठली नव्हती.
- रिपोर्टनुसार, लिऊ आपल्या लठ्ठपणाने ग्रस्त होते. सोबतच डायबेटीज आणि हृदयविकारांचा सुद्धा त्रास सुरू झाला होता.


कुटुंबीय नाराज
कोर्टातील कागदपत्रांप्रमाणे, लिऊच्या या निर्णयावर कुटुंबीय नाराज आहेत. आपल्या भावाने संपत्ती स्ट्रिप डान्सरच्या नावे केल्याने बहिण संतापली होती. लिऊ यांच्या बहिणीने मॅनहॅटन कोर्टात एक याचिका सुद्धा दाखल केली. पण, त्या कोर्टाने व्हेरॉनिकाच्या पक्षातच निकाल दिला.life of Strip Dancer changed after she Gets huge Tip

Post a Comment

 
Top