- नवी दिल्ली - राजस्थान आणि तेलंगणात शुक्रवारी मतदान झाले. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजप आणि पंतप्रधानांसह, योगींवरही हल्ला चढवला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना सुरजेवाला यांनी मोदींना तुघलक तर योगींना औरंगजेबाची उपमा दिली.
काय म्हणाले सुरजेवाला
> पंतप्रधान मोदी मुहम्मद बिन तुघलकाप्रमाणे वागतात तर योगी आदित्यनाथ औरंगजेबाप्रमाणे
> देशात तालिबानी व्यवस्था चालेल की लोकशाही हे ठरवणे गरजेचे आहे.
> मोदींची पोलखोल झाली आहे, आता खोटे बोलून लोकांची दिशाभूल करता येणार नाही.
> मोदी आणि भाजप आतापर्यंत निवडणुकांत लोकांना धर्म, जात आणि प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावर लोकांना विभागत आले आहेत. पण मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकीत त्यांनी देवालाही नाही सोडले.
> पंतप्रधानांनी राजकीय मर्यादा आणि विनम्रतेचे उल्लंघन केले आहे.
> मोदींनी वातावरण दुषित करण्याची एकही संधी सोडली नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment