0
प्रियांका चोप्राच्या लग्नात तिच्या भावाने निक जोनासच्या शेरवानीशी साधर्म्य साधणारी शेरवानी परिधान केली होती...
मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचे काही नवीन फोटोज समोर आले आहेत. हे फोटो प्रियांकाच्या हिंदू पद्धतीने झालेल्या लग्नाचे आहेत. अग्निकुंडाजवळ विधी सुरु असताना प्रियांका निकला प्रेमाने न्याहाळताना फोटोत दिसत आहे. याशिवाय हे दोघे रोमँटिक अंदाजात पोज देतानाही दिसत आहेत.


प्रियांकाच्या भावाने घातली होती निकच्या शेरवानीसारखी मॅचिंग शेरवानी...

- फोटोत प्रियांका लाल लहेंग्यात दिसतेय, तर निक रॉयल शेरवानीत दिसतोय. खास गोष्ट म्हणजे प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थने निकच्या शेरवानीसारखी मॅचिंग शेरवानी परिधान केली होती. तर प्रियांकाच्या आईने पिंक कलरची कांजीवरम साडी नेसली होती. प्रियांका आणि निक 1 डिसेंबर रोजी ख्रिश्चन आणि 2 डिसेंबर रोजी हिंदू पद्धतीने विवाहबद्ध झाले होते.

ओमानमध्ये हनीमून साजरा करत आहेत निक-प्रियांका..

- प्रियांका आणि निक अलीकडेच उदयपूरमध्ये झालेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर हे दोघे हनीमूनला रवाना झाले. ओमानमध्ये हे कपल सध्या हनीमून साजरा करत आहेत. अलीकडेच प्रियांकाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. समुद्रकिनारी रेतीवर प्रियांकाने हार्ट शेपमध्ये दोघांचे नाव लिहिल्याचा फोटो शेअर केला आहे.Unseen Photos Of Nick Jonas And Priyanaka Chopras Hindu Wedding

Post a comment

 
Top