0
पालक आता इतर लोकांना करत आहेत सावध, कुणालाही मुलांना किस करु देऊ नका

एडिलेड. ऑस्ट्रेलियाच्या एडिलेडमधून एका 10 वर्षांच्या मुलीच्या रहस्यमयी मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. येथे राहणा-या ब्रियोनीने एक दिवस अचानक खाणे-पिणे बंद केले. तिला खुप ताप आला आणि अचानक तिचे खुप तोंड आले. मुलीची तब्येत जास्त बिघडतेय हे पाहिल्यानंतर तिची आई तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. डॉक्टरांनी तिला औषध दिले आणि म्हणाले की, एका आठवड्यानंतर पुन्हा चेकअपसाठी या, पण घरी पोहोचल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला.


एका किसने झाला मृत्यू
- ब्रियोनी घरी आल्यानंतर तिची तब्येत अजून जास्त बिघडली आणि तिने प्राण सोडले. मुलीच्या रहस्यमयी मृत्यूमुळे तिच्या कुटूंबियांना धक्का बसला आहे. पण पोस्ट मॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर त्यांना सर्वात जास्त धक्का पोहोचला.
- पोस्टमॉर्टममध्ये कळाले की, मुलीच्या अनेक अंगांनी काम करणे बंद केले होते. यामुळे तिचा मृत्यू झाला. तिच्या शरीरावर हर्प्स सिमप्लेक्स व्हायरसने अटॅक केला होता. हे व्हायरस तिचे ओठ, जीभ आणि हिरड्यांमध्ये होते.
- डॉक्टरांनी सांगितले की, एखाद्या हर्प्सग्रस्त व्यक्तीने मुलीचे चुंबन घेतले असेल. यामुळे हे व्हायरल तिच्या शरीरात गेले आणि कमकुवत इम्यूनिटीमुळे या व्हायरसने तिच्यावर अटॅक केला. यामुळे तिचे अनेक ऑर्गन फेल झाले.

आपल्या मुलांना कुणालाही किस करु देऊ नका
- या दुःखद घटनेतून बाहेर आल्यानंतर ब्रियोनीचे पालक दूस-या पालकांना सावध करत आहेत. ते म्हणत आहेत की, कधीच तुमच्या मुलांचे चुंबन घेऊ नका आणि दूस-यांनाही घेऊ देऊ नका. जर तुम्हीही असे करत असाल तर तोंड पुर्णपणे स्वच्छ असू द्या.

असेही पसरु शकते व्हायरस
- एक्सपर्टनुसार चुंबन घेण्यासोबतच खराब भांडी आणि उष्ठे खाल्ल्यामुळेही असे व्हायरल पसरु शकतात. यामुळे मुलांच्या तोंडाच्या संपर्कात येणारी प्रत्येक वस्तू स्वच्छ असू द्या.
Never Let Someone Kiss Your Baby, Devastated Parents Told Shocking Story

Post a comment

 
Top