0
गेल्या आठवडय़ात भाग्यनगर येथे घरासमोर उभी करण्यात आलेल्या कारवर दगडफेक केल्याच्या आरोपावरुन टिळकवाडी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. पोलीस स्थानकातच त्यांची जामीनवर सुटका करण्यात आली आहे.
रविवारी 25 नोव्हेंबरच्या मध्यरात्री भाग्यनगर पाचवा क्रॉस येथे घरासमोर उभी करण्यात आलेल्या कारवर दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी महाव्दार रोड, कपिलेश्वर रोड परिसरातील तिघा जणांना अटक करण्यात आली असून पोलीस स्थानकातच त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक मौनेश देशनूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. यासंबंधी टिळकवाडी पोलिसांशी संपर्क साधला असता हे एक किरकोळ प्रकरण असल्यामुळे अटक करुन त्यांची जामीनावर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले होते.

Post a Comment

 
Top