0
मुलांच्या कोणत्याही अवयवावरील नृशंस अत्याचाराला या कायद्यात आता गंभीर गुन्हा ठरवण्यात आले आहे.

नवी दिल्ली- मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणांत कठोर शिक्षेसाठी केंद्रीय कॅबिनेटने पोक्सो कायद्यात दुरुस्त्यांना मंजुरी दिली. मुलांच्या कोणत्याही अवयवावरील नृशंस अत्याचाराला या कायद्यात आता गंभीर गुन्हा ठरवण्यात आले आहे. या गुन्हेगारांना मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद नव्या कायद्यात जोडण्यासाठी कलम ४,५ व ६ मध्ये दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात मुलांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी कलम ९ मध्येही दुरुस्ती केली जाईल. लैंगिक शोषणाच्या हेतूने मुलांना विशिष्ट वय होण्याआधीच प्रौढ करण्यासाठी हार्मोन किंवा इतर रासायनिक पदार्थ खाऊ घालणे हा पण आता गंभीर गुन्हा ठरेल. यात चाइल्ड पोर्नाेग्राफीचे नियम आणखी कडक करण्यात आले आहेत.Provision of death penalty for sexual exploitation of children

Post a Comment

 
Top