0
नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, हा डाग धुतल्याशिवाय राहणार नाही,

मुंबई- आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची तुलना थेट कुत्र्याशी केली आहे. 'स्व. माननीय बाळासाहेब असतील, राजसाहेब असतील. त्यांना कुत्रे आवडतात. उद्धव ठाकरेंनी पण तीच परंपरा चालू ठेवली आहे…रामदास कदमच्या रुपात! सतत भुकत असतो..त्याला हे माहीत नाही.. भुंकणारे कुत्रे कधी चावत नाहीत !!” असे झोंबणारे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान, रामदास कदम यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. वडिलांवर केलेली टीका नितेश राणे यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. नितेश यांनी रामदास कदम यांना चांगलेच झोंबणारे प्रत्युत्तर दिले आहे.

नारायण राणेंबाबत काय म्हणाले होते रामदास कदम..?

नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, हा डाग धुतल्याशिवाय राहणार नाही, अशी खोचक टीका रामदास कदम यांनी शुक्रवारी रत्नागिरीत केली होती. कदम हे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. राणेंनी आतापर्यंत किती पक्ष बदलले. शिवसेना सोडल्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. आता भाजपामध्ये आलेत. त्यांच्यासाठी आता फक्त रामदास आठवलेंचा पक्ष शिल्लक राहिला आहे. राणेंनी शिवसेनेच्या जोरावर कोट्यवधींची संपत्ती कमावली. नारायण राणेंसारख्या व्यक्तीला ‘सूर्याजी पिसाळची अवलाद’ ही उपमादेखील कमी पडेल, असा टोला कदम यांनी लगावला होता. वडिलांवर केलेल्या टीकेवर नितेश राणे यांनी कदमांची तुलना थेट कुत्र्यासोबत केली आहे.Narayan Ranes Sons Nitesh Rane target to Ramdas Kadam

Post a comment

 
Top