0
शनिवार राशिफळ : श्रीदत्त जयंती आणि मृग नक्षत्रामुळे दिवस राहील खास, या 8 राशीच्या लोकांना मिळू शकतो कामामध्ये विशेष लाभ.

शनिवार, 22 डिसेंबरला मार्गशीर्ष मासातील पौर्णिमा तिथी आहे. यासोबतच आज श्रीदत्त जयंतीसुद्धा आहे. यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आज मृग नक्षत्र असल्यामुळे शुभ नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांना बिझनेस, वैवाहिक आयुष्यात तसेच जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात चांगला लाभ मिळेल. प्रेमसंबंध सुधारतील. इतर 4 राशींना मात्र हा शनिवार संमिश्र फळ देणारा ठरू शकतो.

मेष : आज कंटाळवाणा दिवस. दैनंदीन क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. विद्यार्थी अभ्यासात चालढकल करतील. गृहीणींना शेजारधर्म जपावा लागेल. शुभ रंग : चंदेरी | अंक : 3
वृषभ : आज तुम्हाला काही सज्जनांचा सहवास लाभेल. त्यांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. अती सडेतोड बोलल्याने आपलीच माणसे दुखावण्याची शक्यता आहे. शुभ रंग : क्रिम | अंक : ५
मिथुन : आज तुम्ही स्वत:च्या प्रेमात रहाल. चैन करण्यासाठी पैसा खर्च कराल. मीच म्हणेन ती पूर्व असे तुमचे धोरण राहील. पूर्वीच्या गुंतवणूकीतून फायदा होईल. शुभ रंग : पिस्ता | अंक : ७
कर्क : नवीन व्यावसायिक मंडळींनी आपल्या मर्यादा ओळखूनच उलाढाली केलेल्या बऱ्या. आज अती आक्रमकतेने निराशाच पदरी पडेल. थोर मंडळींचे  अनुभवाचे बोल ऐकून घ्यायला हरकत नाही.  शुभ रंग : हिरवा | अंक : ९
सिंह : आज मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रातील नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. वैवाहीक जिवन सौख्यपूर्ण राहील. आरोग्य उत्तम साथ देईल. शुभ रंग : मोरपंखी | अंक : २
कन्या : आज तुम्ही फार हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर मात्र महागात पडेल. सामंजस्याचे धोरण हिताचे राहील. शुभ रंग : लाल | अंक : ४
तूळ : नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरीष्ठांच्या मागे पुढे करावेच लागणार आहे. कोणतेही कौटुंबिक निर्णय वडीलधाऱ्यांच्या संगनमताने घ्यावे लागतील. शुभ रंग : अबोली | अंक : ७
वृश्चिक : कार्यक्षेत्रातील काही मनाविरुध्द घटना तुम्हाला बेचैन करतील. आज जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच.  शुभ रंग : निळा | अंक : ६ 
धनू : व्यावसायिक उलाढाल वाढेल. खर्च योग्य कारणांसाठीच होईल. काही दूरावलेली नाती जवळ येतील. वैवाहीक जिवनांत आज दाेघांत तिसऱ्याला प्रवेश देऊच नका.   शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९

मकर : वादविवादात आज तुम्ही स्वत:चेच घोडे पुढे दामटवाल.आर्थिक व्यवहारात मात्र सावध रहाणे गरजेचे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. तब्येत सांभाळा. शुभ रंग : डाळिंबी | अंक : २
कुंभ : सौंदर्य प्रसाधने, चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. ऐशआरामी वृत्ती बळावेल. गृहीणी आज ब्युटी पार्लरसाठी आवर्जुन वेळ काढतील. छान दिवस. शुभ रंग : पिवळा  | अंक : ३
मीन : आर्थिक आवक पुरेशी असून अाज परिवारात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखादी अडचण शेजाऱ्यांच्या मदतीने दूर होईल. मुले आज्ञा पाळतील. शुभ रंग : पांढरा | अंक : १



Saturday 22 December 2018 Daily horoscope in marathi

Post a comment

 
Top