0
न्यूज डेस्क - प्रसिद्ध भारतीय गोल्फर ज्योती रंधावाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर अवैध शिकार केल्याचा आरोप आहे. शिकारीची ही केस उत्तर प्रदेशच्या बहराईचमधील आहे. या आरोपावरूनच रंधावाला अटक करण्यात आली आहे. रंधावाजवळून A.22 ची एक राइफलही हस्तगत करण्यात आली आहे.
गोल्फर रंधावाला नुकतेच महाराष्ट्रच्या यवतमाळमधील नरभक्षण वाघिणीच्या शोधपथकात सामील करण्यात आले होते. वाघिणीच्या शोधासाठी स्थापन केलेल्या विशेष डॉग टीमचे नेतृत्व ज्योती रंधावानेच केले होते. यासाठी त्यांना विशेष करून दिल्लीहून यवतमाळला बोलावण्यात आले होते. आता तो स्वत:च अवैध शिकारीच्या आरोपात अडकला आहे.
1994 पासून प्रोफेशनल गोल्फ खेळत असलेल्या ज्योती रंधावाने एशियन टूरपासून ते यूरोपियन टूरमध्येही सहभाग नोंदवलेला आहे. 2004 मध्ये यूरोपियन टूरमध्ये त्याने विशेष कामगिरीही केली होती.Golfer Jyoti Randhawa arrested on poaching charges in Uttar Pradesh's Bahraich

Post a Comment

 
Top