भोपाळ - दैनिक भास्करचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांचा ७४वा जन्मदिन ३० नोव्हेंबरला प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त समूहाच्या वतीने रमेशजींनी सामाजिक हिताच्या दृष्टीने केलेले कार्य व प्रेरणादायी पुढाकार कायम ठेवत अनेक नवे कार्यक्रम सुरू केले.
प्रेरणादिनी ११ राज्यांतील २०६ शहरांत २४६ रक्तदान शिबिरे घेण्यात आली. यात ११,७७४ युनिट रक्तदान झाले. बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्रासारख्या राज्यांत ही शिबिरे झाली. राजस्थानमध्ये सर्वाधिक सुमारे २५४५ युनिट रक्तदान झाले. हरियाणा (१८७० युनिट) दुसऱ्या तर गुजरात (१४७८ युनिट) तिसऱ्या स्थानी राहिले.प्रेरणादिनी दैनिक भास्करच्या सर्व कार्यालयांत, ब्युरोंमध्ये २१ ते २७ नोव्हेंबरपर्यंत वस्त्रदान कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यात दान स्वरूपात मिळालेली वस्त्रे ३० नोव्हेंबरला वेगवेगळ्या अनाथालयांत आणि वृद्धाश्रमांत गरजू लोकांना वाटण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment