लोक म्हणतात, मी शानदार आहे. माझे काम चांगले आहे. मात्र मी ते गांभीर्याने घेत नाही.-शाहरुख

- मुंबई- 'प्रेक्षकांना जे पाहायची इच्छा असते तेच ते पाहतात. लोकांना आकर्षित करण्यासाठी सर्वोत्तमच काम करण्याचा मला ध्यास असतो. यामुळे प्रत्येक क्षणी मी अत्युच्च प्रयत्न करत असतो,' हा मंत्र आहे अभिनेता शाहरुख खानचा. आपल्या 'झीरो' चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी (२१ डिसेंबर) शाहरुखशी झालेल्या संवादातील प्रमुख अंश...
झीरोमध्ये बुटक्याची भूमिका साकारणे अवघड होते?
इतकेही अवघड नव्हते. शूटिंगच्या ८-९ महिन्यांनंतर काम पाहून आम्ही खुश होतो. हे सर्व व्हीएफएसक्सविना अशक्य होते. व्हीएफएक्समुळे शूटिंगला बराच कालावधी लागला अन् ते बरेच खर्चिक होते.अत्यंत मेहनत करूनही अनेकदा चित्रपट पडतो तेव्हा काय वाटते?
प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असतो. यामुळे ही चिंता झटकून टाकावी लागते. काही लोकांना तो अत्यंत आवडू शकतो, काहींना नावडूही शकतो. मेहनत करूनही चित्रपट न चालल्यास वाईट तर वाटतेच.आजवरच्या कामाकडे तुम्ही कसे बघता?
हे अत्यंत मुश्कील काम आहे. जेव्हा लोकांना माझे काम आवडत नाही तेव्हा ते का पसंतीस उतरले नाही, हे मलाच उमगत नाही. यामुळे मी त्यात माझा वेळ वाया घालवत नाही. मला माहीत आहे की, लोकांना जे पाहायचे असते तेच ते पाहतात. यामुळे मी प्रत्येक मिनिटाला सर्वाेत्तम देण्याचा प्रयत्न करत असतो.कन्या सुहानाही चित्रपटात पदार्पणाच्या तयारीत आहे का?
सुहानाने अभिनय क्षेत्र निवडल्यास मला आनंदच होईल. रंगभूमी, स्ट्रीट आणि एकांकिका केल्यास मी अगदीच हरखून जाईल. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच ती आपला मार्ग निवडेल.चित्रपटांबाबत लोकांचा निर्णय तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे?
प्रत्येक चित्रपटाच्या यशाचे निकष वेगवेगळे असतात. जेव्हा व्यावसायिक चित्रपट निर्मिती करतो तेव्हा लोक म्हणतात की, तुम्ही चांगला अभिनय केला. मात्र चित्रपट चालला नाही. आपण जेव्हा मोठे स्टार असतो तेव्हा लोकांना आशा असते आपला प्रत्येक चित्रपट चांगलाच चालावा. मात्र हे खरं नाही.आजच्या युगात व्हीएफएक्सविना चित्रपट निर्मिती शक्य आहे?
व्हीएफएक्सविना खूप चांगल्या पद्धतीने काम करणे अवघड होऊन बसते. मी बाहुबली चित्रपटाचे खूप अभिनंदन करतो. त्याने व्हीएफएक्स क्षेत्रात मार्गदर्शक काम केले आहे. व्हीएफएक्स व तंत्रज्ञान हे कथानक मजबूत करण्यासाठी आहे, लोकांना प्रभावित करण्यासाठी नव्हे.किंग खान, सुपरस्टार वा अशा अनेक नावांनी चाहत्यांमध्ये तुमची ओळख आहे. त्यावर तुमचे मत काय?
लोक म्हणतात, मी शानदार आहे. माझे काम चांगले आहे. मात्र मी ते गांभीर्याने घेत नाही. मी खूप मेहनत घेतो. घरी जाऊन झोपतो. नेहमी मी सर्वाेत्तम काम करण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा ते उत्कृष्ट ठरतेही. मात्र, काही वेळा कमीही पडतो.
Post a Comment