विवाहीता दोन ते तीन दिवसापासून घरातून बेपत्ता होती.
उगाव- निफाड तालुक्यातील खेडे येथील बेपत्ता विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. येथील पूनम सचिन जाधव (२५) ही विवाहीता दोन ते तीन दिवसापासून घरातून बेपत्ता होती. याबाबत निफाड पोलिसांत बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.
रविवारी ११ वाजेदरम्यान सदर विवाहितेचा मृतदेह खेडे येथील संजय बाळकृष्ण गायकवाड यांच्या गट नंबर ४५२ मधील विहिरीत आढळून आला. याप्रकरणी निफाड पोलिसांत खबर देताच पोलिस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. निफाड उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर विवाहितेच्या पश्चात पती व दोन मुले आहेत. निफाड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Post a Comment