0
 • Japan shows its love for Baahubaliएन्टटेन्मेंट डेस्क. प्रभास आणि अनुष्का शेट्टी स्टारर 'बाहुबली'ने कमाई आणि लोकप्रियता, दोन्हीचा विक्रम केला आहे. रिलीजच्या अनेक वर्षांनंतरही याची क्रेझ अजून संपलेली नाही. भारतातच नाही, आता जापानमध्येही बाहुबलीची क्रेझ दिसतेय. येथे अमरेंद्र बाहुबलीच्या मुर्ती तयार केल्या जात आहेत.


  डिझायनर पोस्टर्स, गेमिंग कार्ड्सच्या माध्यमातून जापाने व्यक्त केले प्रेम 
  बाहुबली-द बिगनिंग(2015) आणि याचा सीक्वल बाहुबली-द कन्क्लूजन(2017) मध्ये आला होता. तर जापानमध्ये हे दोन्ही चित्रपट 8 एप्रिल आणि 29 डिसेंबर 2017 ला रिलीज झाले. दोन्ही चित्रपटांनी 1 मिलियन डॉलरपेक्षा जास्त बिझनेस केला होता. पण जापानी दर्शकांमध्ये एक वर्षांनंतरही बाहुबलीचा प्रभाव दिसतोय. हा चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा थिएटरमध्ये जापानी प्रेक्षकांनी बाहुबली-बाहुबलीचे नारे लावले होते. यासोबतच डिझाइनर पोस्टर्स, गेमिंग कार्ड्स आणि कॉसप्लेच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केले होते. वर्षभरानंतरही हा जोश मी झाला नाही. आता अमरेंद्र बाहुबलीच्या अनेक पोजमध्ये प्रोटो-टाइप बनवून ही भूमिका लक्षात ठेवली जात आहे. चाहत्यांनी इंस्टाग्रामवर बाहुबली बनलेल्या प्रभासच्या या मुर्तीचे फोटो पोस्ट केले आहेत.
  चीन-जापान बॉलिवूड चित्रपटांचे नवीन मार्केट 
  बॉलिवूड चित्रपटांसाठी गेल्या दोन वर्षांमध्ये चीन आणि जापानमध्ये नवीन मार्केट तयार झाले आहे. बाहुबलीसोबतच सुल्तान (36 करोड़), दंगल (1848 करोड़), पीके (107 करोड़), 3 इडियट्ससारख्या चित्रपटांनी या देशांमध्ये चांगली कमाई केली आहे. आमिरच्या 'ठग्ज...' भारतात फ्लॉप झाला असला तरी मेकर्सला चीन आणि जापानमधून कमाईची अपेक्षा आहे. बाहुबली-द कन्क्लूजनने जापानमध्ये 100 दिवसात 8.5 कोटींचा बिझनेस केला होता.
  अमेझॉनवर मिळत आहेत बाहुबली आणि भल्लालदेव 
  बाहुबलीची लोकप्रियता पाहता आता याचे मल्टीकलर खेळणे ऑनलाइन मिळत आहेत. ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनवर बाहुबली आउट ऑफ स्टॉक आहे तर भल्लालदेव 499 रुपयांमध्ये मिळत आहेत.

Post a Comment

 
Top