0
जयपूर -  माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पलटवार केला आहे. ''वसुंधरा राजेंना आराम द्या, त्या थकल्या आहेत, खूप जाड झाल्या आहेत'', असे वादग्रस्त विधान शरद यादव यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान केले होते. यादव यांच्या या विधानावर वसुंधरा राजेंनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. 

वसुंधरा राजेंचा पलटवार
'शरद यादव यांच्या विधानामुळे मी स्तब्ध झाले आहे. एवढा मोठा नेता आपल्या जीभेवर संयम ठेऊ शकत नाही, तर त्याचे वाईट वाटते. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी निवडणूक आयोगानं याची दखल घ्यावी. त्यांच्या विधानामुळे माझा अपमान झाला आहे. खरंतर हा महिलावर्गाचा अपमान आहे'.

राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान, झालरापाटन येथे वसुंधरा राजे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राजेंनी शरद यादव यांच्या टीकेला उत्तर दिलेRajasthan Elections 2018: Rajasthan CM Vasundhara Raje slams sharad yadav on his comments | Rajasthan Elections 2018 : 'हा तर महिलांचा अपमान'; शरद यादवांच्या वादग्रस्त विधानावर वसुंधरा राजेंचा पलटवार

Post a Comment

 
Top