0
जिल्ह्यात अल्पवयीन, असहाय्य युवतींना शरीरविक्रयासाठी प्रवृत्त केले जात आहे. कोवळ्या जीवांची राखरांगोळी होत असतानाही सामाजिक प्रश्‍नांचे गांभीर्य नसावे? शरीराचे लचके तोडणार्‍या तस्करांना बेड्या कधी पडणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

युवतींच्या आयुष्याशी खेळणार्‍या शंभरावर एजंटांना कोठडीत डांबून अनैतिक व्यापार प्रतिबंधक पथकाने दीड वर्षात 75 युवतींची सुटका केली. त्यात 52 बंगाली युवतींचा समावेश आहे. 2015 ते डिसेंबर 2018 या काळात असहाय्य युवती, महिलांना जबरदस्तीने शरीरविक्रयासाठी प्रवृत्त करणार्‍या टोळ्यांच्या संख्येत वाढच होत गेली. अलीकडील दीड वर्षात 98 एजंट जेरबंद झाले असले, तरी अनेक युवतींची वाताहत झाली आहे. 
जिल्ह्यात बेधडक कुंटणखाने...
तत्कालीन पथकातील विद्या जाधव, शीतल लाड, माधवी घोडके यांनी गतवर्षी बंगाली एजंट मीलन शेखला बेड्या ठोकून टोळीचा पर्दाफाश केला. त्यात कोरोचीतील स्थानिक एजंटासह काही महिलांची नावे उघड झाली होती. त्यानंतरही कुंटणखाने जिल्ह्यात बेधडक सुरू राहिले आहेत.
बंगाल, दिल्‍लीतून सर्वाधिक मानवी तस्करी
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने शहरासह कागल, जयसिंगपूर, हातकणंगले, गोकुळ शिरगाव, शिरोली, शहापूर, मलकापूर रोडवरील काही हॉटेल्स, लॉजवर छापे टाकून युवतींची सुटका केली. एजंटांच्या साखळीवर बडगा उगारूनही प्रकार थांबले नाहीत. बांगलादेशींसह पश्‍चिम बंगाल, दिल्‍ली, बिहारमधून युवतींची कोल्हापूरसह सांगली, सातारा, कर्नाटकात तस्करीचे प्रमाण सर्वाधिक आहे. 
 

Post a Comment

 
Top