0
मुलाच्या लग्नात राजामौलींनी केला डान्स, साऊथच्या अनेक सुपरस्टार्सची हजेरी

मुंबईः 'बाहुबली' (Baahubali) चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा मुलगा कार्तिकेयचे लग्न 30 डिसेंबर रोजी जयपूर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. कार्तिकेयचे लग्न साऊथची क्लासिकल सिंगर पूजासोबत झाले. लग्नात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी झाले होते. या लग्नाचे काही व्हिडिओज समोर आले असून यामध्ये सुपरस्टार नागार्जुन, ज्युनियर एनटीआर, रामचरण तेजा, प्रभास आणि राणा दग्गुबती थिरकताना दिसले.

दाक्षिणात्य अभिनेते जगपती बाबू यांची भाची आहे पूजा...
- राजामौली यांचा मुलगा कार्तिकेयची पत्नी पूजा ही दाक्षिणात्य अभिनेते जगपती बाबू यांची भाची आहे. कार्तिकेय हा 'बाहुबली' या चित्रपटाच्या दोन्ही भागांचा यूनिट डायरेक्टर आहे.
- कार्तिकेयचे लग्न जयपूरच्या कुकस येथे झाले. कुकस हा एक इंडस्ट्रियल एरिया आहे. येथील 7 स्टार हॉटेलमध्ये कार्तिकेय आणि पूजा यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.
- लग्नात सहभागी होण्यासाठी नागार्जुन, ज्युनियर एनटीआर, अनुष्का शेट्टी, नेमसी नानी, जग्गू भाई, सुष्मिता सेनसह अनेक सेलब्स जयपूरमध्ये पोहोचले होते.


सिनेमॅटोग्राफी फील्डमध्ये अॅक्टिव आहे राजामौली यांचा मुलगा कार्तिकेय...
- राजामौली यांचा मुलगा कार्तिकेय सिनेमॅटोग्राफी फील्डमध्ये अॅक्टिव आहे. राजामौली यांच्या पत्नीचे नाव रमा असून कार्तिकेय हा तिचा आणि तिच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे. राजामौली आणि रमा यांी मयुखा नावाची एक मुलगी दत्तक घेतली आहे.

Post a Comment

 
Top