0
या अत्यंत धक्कादायक अपघातानंतर मात्र जे काही झाले त्याकडे लोक पाहतच राहिले.

पोलंड - साऊथ पोलंडमधील हा रोड अॅक्सिडेंट पाहून तुम्ही थक्क व्हाल. येथे एका झेब्रा क्रॉसिंगवर लावलेल्या कॅमेऱ्यात घटना रेकॉर्ड झाली. एक चिमुरडी झेब्रा कॉसिंग पार करताना एका भरधाव आलेल्या कारने तिला उडवल्याचे यात दिसले. ही धडक एवढी जोरदार होती की, चिमुरडी अनेक फूट हवेमध्ये उडाली आणि दुसऱ्या कारला जाऊन धडकली.


पाहतच राहिले लोक
- जोरदार धडक लागताच मुलगी एखाद्या खेळण्याप्रमाणे उडून दुसऱ्या बाजुचत्या कारला धडकली. त्या कारचा ड्रायव्हर लगेचच तिला वाचवण्यासाठी धावला.
- पण या ड्रायव्हरला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. कारण एवढ्या जोरदार धडकेनंतरही या मुलीला काहीही झाले नाही. ती लगेचच उठून उभी राहिली आणि कपडे स्वच्छ करत त्याठिकाणाहून पळून निघून गेली.


किरकोळ खरचटले..
लोकल मीडिया रिपोर्ट्सनुसार मुलीला या घटनेत काही ठिकाणी किरकोळ खरचटल्याच्या जखमा झाल्या. कार ड्रायव्हरच्या विरोधात गुन्हा दाखल झाला की, नाही हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

small girl flied in air after speedy car dashed her

Post a comment

 
Top