0
सांगलीतील अवैध गर्भपात प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत कारागृहात असलेल्या येथील डॉ. विजय चौगुले आणि डॉ. रूपाली चौगुले यांना शासनाने अखेर निलंबित केले आहे. जिल्हा शल्य चिकीत्सकांनी दोघांनाही कारागृहात जाऊन निलंबनाचा आदेश बजावला.
 डॉ. विजयकुमार चौगुले ह कोल्हापूर जिल्हय़ातील गारगोटी येथे तर डॉ. रूपाली चौगुले या सांगली जिल्हा परिषदेकडे वैद्यकीय अधिकरी म्हणून कार्यरत होत्या. येथील चौगुले हॉस्पिटल मध्ये ब्sाsकायदा गर्भपात केल्याप्रकरणी 15 सप्टेंबर 2018 रोजी छापा पडला होता. महापालिका आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये चौगुले हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीरपणे 9 गर्भपात केल्याचं तपासात निष्पन्न होते. तसेच विनापरवाना 46 कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया सुद्धा त्यांनी केल्या होत्या   
 म्हैसाळ येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापूरे याच्या हॉस्पीटलमध्ये झालेल्या गर्भपात केंद्राची चौकशी होण्यापूर्वीच सांगलीत उघडकीस आलेल्या या प्रकरामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी डॉ. रुपाली चौगुले आणि डॉ. विजय चौगुले याना 17 आणि 18 सप्टेंबरला अटक करण्यात आली आहे. पोलीस कोठडीनंतर या दाम्पत्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या हॉस्पिटलचा परवाना महापालिकेने केला रद्द केला होता.
 त्याचबरोबर दोघांनाही शासकीय सेवेतून निलंबित करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव 17 सप्टेंबर 2018 रोजी शासनाकडे पाठवला होता. पण, त्यानंतर एक महिन्यानंतर दोघांच्या निलंबनाचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत. जिल्हा शल्य चिकीत्सकांनी कारागृहात जावूनन् नुकताच हा आदेश दोघांनाही बजावला असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

 
Top