भाजपला हिंदुत्वाचा विसर पडला असल्याचा आरोप करत शिवसेनेने अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी हिवाळी अधिवेशनात अध्यादेश आणावा, अशी मागणी गुरुवारी (दि.१३) केली आहे.
लोकसभेत शुन्य प्रहरावेळी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. सभागृहात शिवसेना खासदारांनी फलक दाखवित लवकरात लवकर मंदिर उभारा, अशी मागणी केली. भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. तरीही त्यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. सरकारने या प्रश्नी ताबडतोब अध्यादेश आणावा, अशी मागणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी केली आहे.
भाजपने याआधी सत्तेत असतानाही मंदिर प्रश्नी काहीच हालचाली केलेल्या नाहीत. मात्र, आता त्यांच्याकडे पूर्ण बहुमत असतानाही ते काही करत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.
हिंदुत्वाच्या मुद्यावर सेना- भाजपची युती झाली होती. मात्र, भाजपला हिंदुत्व या मूळ मुद्याचा विसर पडला आहे, असे अडसूळ यांनी म्हटले आहे. त्यांनी भाजपचे जेष्ठ नेते एल. के. अडवाणी यांची आठवणी काढत त्यांनी राम मंदिरासाठी १९९२ मध्ये रथयात्रा काढली होती. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला अयोध्येचा दौरा करत राम मंदिर उभारणीवर जोर दिला होता. राम मंदिर प्रश्नी भाजपने निष्क्रियता दाखविल्याने पाच राज्यांत भाजपची कामगिरी चांगली झालेली नाही, असेही अडसूळ यांनी नमूद केले आहे.

Post a Comment